Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्तला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

| Updated on: Aug 10, 2020 | 4:26 PM

प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात (सोमवार 10 ऑगस्ट) संजयला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्तला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. श्वासोच्छवास करताना त्रास होत असल्याने संजय दत्तला दोन दिवसांपूर्वी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Bollywood Actor Sanjay Dutt gets Discharge from Lilavati Hospital)

श्वास घेताना त्रास होत असल्याने संजय दत्तला रविवारी (8 ऑगस्ट) लीलावतीमध्ये नेण्यात आले. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात (सोमवार 10 ऑगस्ट) संजयला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

प्रसिद्ध छायाचित्रकार विराल भयानी यांनी संजय दत्तला डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद” असे ट्वीट संजय दत्तने त्याच रात्री केले होते.

संजय दत्त लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर होता. त्याची पत्नी मान्यता दत्त ही दोन्ही मुलांसह दुबईला होती. संजय दत्तचा ‘पानिपत’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तो सड़क 2, शमशेरा, भुज, केजीएफ, पृथ्वीराज आणि तोरबाज अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे काही चित्रपटांच्या शूटींगला ब्रेक लागला होता. (Bollywood Actor Sanjay Dutt gets Discharge from Lilavati Hospital)