Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

चार दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियानने मुंबईतील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली (Sushant Singh Rajput Manager suicide) होती.

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

मुंबई : चार दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियानने मुंबईतील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली (Sushant Singh Rajput Manager suicide) होती. त्यानंतर आज (14 जून) सुशांतनेही राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे (Sushant Singh Rajput Manager suicide).

दिशा आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मालाडच्या एका 14 मजली इमारतीमध्ये राहत होती. तिने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी सुशांत सिंहला याबाबत विचारले असता सुशांतही मानसिक तणावाखाली होता, असं पोलिसांनी सांगितले होते.

“ही खूप वाईट बातमी आहे. दिशाच्या कुटुंब आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे तिच्या आत्माला शांती मिळो”, अशी पोस्ट सुशांतने इन्स्टाग्रामवर केली होती.

दिशाने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्यानंतर तिला बोरिवलीच्या रुग्णालयात नेले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक कलाकारांनी काम मिळत नसल्याने आत्महत्या केल्या आहेत. हे वर्ष बॉलिवूडसाठी काही खास नाही. यावर्षी अनेक बड्या कलाकारांचे निधन झाल्याचे ऐकून चाहत्यांमध्ये नाराजी आहे. याआधी क्राईम पेट्रोलमधील अभिनेत्री प्रेक्षा मेहतानेही पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली होती.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI