Peshawar Blast | पाकिस्तानातील पेशावर IED स्फोटाने हादरलं, 8 जणांचा मृत्यू, अनेक चिमुकले जखमी

पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाल्याची माहिती आहे. (Bomb Explosion in Peshawar city of Pakistan eight died)

Peshawar Blast | पाकिस्तानातील पेशावर IED स्फोटाने हादरलं, 8 जणांचा मृत्यू, अनेक चिमुकले जखमी

नवी दिल्ली :  पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED बॉम्ब स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पेशावर मधील दीर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. (Bomb Explosion in Peshawar city of Pakistan eight died)

लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार  70 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्याात आली असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे.

पेशावरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 19 मुले जखमी झाल्याची माहिती असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी मुलांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

चीन, पाकिस्तानसोबत युद्धाची तारीख मोदींनी ठरवली? भाजप नेत्याचं प्रचारसभेत वादग्रस्त विधान

कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता, नवाज शरीफांची कबुली

(Bomb Explosion in Peshawar city of Pakistan five died)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI