पुण्यात उड्डाणपुलावर बॉम्ब आढळल्याने खळबळ

| Updated on: Nov 01, 2019 | 9:01 PM

पुण्यात रेल्वे पार्किंगजवळील रस्त्याच्या बाजूला हॅन्डग्रेनेड आढळून आल्यानं एकच खळबळ (Pune bomb found) उडाली आहे.

पुण्यात उड्डाणपुलावर बॉम्ब आढळल्याने खळबळ
Follow us on

पुणे : पुण्यात रेल्वे पार्किंगजवळील रस्त्याच्या बाजूला हॅन्डग्रेनेड आढळून आल्यानं एकच खळबळ (Pune bomb found) उडाली आहे. पुण्यातील ताडीवाला रस्त्याच्या परिसरातील पार्किंगच्या बाजूला हे हॅन्डग्रेनेड आढळून आले आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने तो निकामी (Pune bomb found) केला.

पुण्यातील प्रसिद्ध ताडीवाला रस्त्यावर रेल्वे विभागाचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी पादचारी उड्डाणपूल आहे. या पुलाजवळ असलेल्या पार्किंगच्या रस्त्यावर हे हॅन्डग्रॅनाईट सदृश्य वस्तू असल्याचे जाणवले. त्यावेळी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॅन्डग्रेनेड असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली होती.

यानंतर रेल्वे प्रशासनाने पुणे पोलिसांना ही माहिती दिली आहे. यानंतर पुण्याच्या बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा बॉम्ब निकामी (Pune bomb found) केला.

या हॅण्डग्रॅनाईट सदृश वस्तूचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. याबाबत सध्या अधिक तपास सुरु आहे.