विकृतीचा कळस, तरुणाचा बकरीवर बलात्कार

विकृतीचा कळस, तरुणाचा बकरीवर बलात्कार

केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) : माणसामधील विकृतीने कळस गाठल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. 21 वर्षीय तरुणाने बकरीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण अफ्रिका देशातील आहे. दक्षिण अफ्रिकेत घडलेल्या  या प्रकारात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मी बकरीकडून यासाठी परवानगी घेतली असल्याचा अजब दावा या विकृत तरुणाने केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागिरकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. तर प्राणीमित्रांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

आरोपी केनेडी कंबानीला बकरीच्या मालकाने रंगेहाथ पकडले आहे. सुरुवातीला बकरीच्या मालकाला वाटले कोणी आपली बकरी चोरत आहे. मात्र संशय आल्याने मालक शेजारील लोकांसोबत चोराला पकडण्यासाठी गेला असता, तेथे आरोपी बकरीवर बलात्कार करताना दिसला.

याआधीही अशा घटना !

  • नोव्हेंबर 2018 रोजी जाम्बिया मध्ये 22 वर्षाच्या रुबेन मवाबाने प्रग्नेंट बकरी सोबत बलात्कार केल्याने 15 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती.
  • काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकामध्ये 33 वर्षाच्या फेसेलानी मकुबेला शेजारच्या घरातील बकरी सोबत बलात्कार करत असल्याने दोषी ठरवण्यात आले होते.
  • भाराततही पशुंसोबत आतापर्यंत अनेक अत्याचाऱ्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील वर्षी जानवरीमध्ये गुजरातच्या वडोदराला गायीसोबत अमानवीय कृत्य करत केल्याची घटना समोर आली होती. तर वडोदरापासून 30 किमी अतंरावर पोर गावात काही लोकांनी गायीवर बलात्कार केला होता.
  • जुलै 2018 मध्ये हरियाणाच्या मेवातमध्ये 8 लोकांनी एका बकरीसोबत आक्षेपार्ह कृत्य केले होते. बकरीच्या मालकाने या संबधित तक्रार दाखल केली होती.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबर 2018 मध्ये अशीच घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली होती. चार नराधमांनी एका कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती आणि यामुळे त्या कुत्र्याचा मृत्यूही झाला होता.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI