भारताने हनुमानाप्रमाणे संजीवनी द्यावी, ब्राझीलच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र

| Updated on: Apr 08, 2020 | 1:28 PM

भगवान श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे हनुमानजींनी हिमालयातून संजीवनी आणली, त्याप्रमाणे भारताने मदत करावी, अशी विनंती ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. (Brazil President Jair Bolsonaro writes to PM Modi)

भारताने हनुमानाप्रमाणे संजीवनी द्यावी, ब्राझीलच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र
Follow us on

नवी दिल्ली : संपूर्ण जग प्राणघातक ‘कोरोना विषाणू’ने त्रस्त आहे. प्रत्येक देश आणि राष्ट्रप्रमुख आपल्या देशवासियांना दिलासा देत संकटातून बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेनंतर आता ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. बोल्सनारो यांनी आपल्या पत्रात संकटमोचक देव हनुमानाचा उल्लेख केला आहे. (Brazil President Jair Bolsonaro writes to PM Modi)

हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरच ब्राझीलच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात हनुमानाचा उल्लेख केला आहे. “भगवान श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे हनुमानजींनी हिमालयातून संजीवनी आणली. ज्याप्रकारे येशू ख्रिस्ताने आजारी लोकांना बरे केले, त्याचप्रकारे भारत आणि ब्राझील या संकटात एकत्र येऊन भरारी घेऊ शकतात. दोन्ही देशांनी लोकांच्या हितासाठी पावले उचलली पाहिजेत. या कठीण क्षणी माझी विनंती स्वीकारा” असं अध्यक्ष जेर बोल्सनारो यांनी लिहिलं आहे.

अध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी मलेरियावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मदत मागितल्याची माहिती आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध निर्यात करण्याची विनंती केली होती.

‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने काल संध्याकाळी जाहीर केलं. ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी भारताने उठवली नाही, तर प्रत्युत्तर देण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिला होता. (Brazil President Jair Bolsonaro writes to PM Modi)

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन काय आहे?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे.

हेही वाचा‘नरेंद्र मोदी ग्रेट!’ डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई

भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जगात या औषधांच्या उत्पादनात भारताचा 70 टक्के वाटा आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारात हे औषध परिणामकारक ठरत आहे.

देशाची दरमहा 40 टन हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) उत्पादन करण्याची क्षमता आहे. हे 200-200 मिलीग्रामच्या 200 दशलक्ष टॅब्लेटच्या बरोबरीचे आहे. हे औषध ‘रुमेटाइड आर्थराइटिस’सारख्या ‘ऑटो इम्यून’ रोगाच्या उपचारात देखील वापरले जाते, त्यामुळे देशात याची उत्पादन क्षमता चांगली आहे.

मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. (Brazil President Jair Bolsonaro writes to PM Modi)