बुलडाणा ZP निकाल : अध्यक्ष काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली (buldhana zp election result) आहे.

बुलडाणा ZP निकाल : अध्यक्ष काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 4:37 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली (buldhana zp election result) आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांची वर्णी लागली (buldhana zp election result) आहे.

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते. भाजपतर्फे अध्यक्ष पदासाठी रुपाली काळपांडे आणि उपाध्यक्षपदासाठी जयश्री विनोद टिकार असे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्याने बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा पवार वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कमलताई यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले (buldhana zp election result) आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्नांसोबतच इतर विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त अध्यक्ष मनीषा पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून महिलांच्या आरोग्यावरही भर देणार असल्याचे उपाध्यक्ष कमलाबाई बुधवत यांनी सांगितले (buldhana zp election result).

बुलडाणा जिल्हा परिषदेत एकूण 60 सदस्य संख्या असून भाजपच्या एक सदस्याने राजीनामा दिल्याने 59 सदस्य आहेत. त्यात काँग्रेस 14, राष्ट्रवादी 8, शिवसेना 10, भाजप 23, भारिप 2 आणि अपक्ष 2 असे संख्याबळ  आहे.

यंदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासआघाडी असल्याने भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं आहे. यापूर्वी भाजपने राष्ट्रवादीशी आघाडी करुन सत्ता घेतली होती. मात्र आता महाविकासआघाडीने एकत्र जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन केली (buldhana zp election result) आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.