
Benefits of Carrot Juice : थंडीत तापमानात घट झाल्याने लोकं हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडतात. त्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे असते. कोसेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही ताजा गाजराचा रस पिऊ शकता. गाजरमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी3, ई, के, मॅंगनीज, बायोटिन, फॉस्फरस, फोलेट सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. दृष्टी सुधारण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत गाजर मदत करते. गाजराचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतात जाणून घ्या.
गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए सोबतच मुबलक प्रमाणात बीटा-कॅरोटीन असते. जे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
गाजराच्या रसामध्ये पोटॅशियम आढळते जे खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. यासोबतच हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
गाजराच्या रसात व्हिटॅमिन के सोबत प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण पूर्ण करते. त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात.
गाजरात मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि कॅरोटीनोइड्स आढळतात. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.
गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळते जे ग्लुकोज, चरबी आणि प्रथिने नष्ट करण्यास मदत करते. यासोबतच यामध्ये असलेले फॉस्फरस मेटाबॉलिज्म वाढवण्याचे काम करते.
गाजराचा रस बनवण्यासाठी आवळा, धणे, मिरपूड, टोमॅटो आणि खडे मीठ गाजरासोबत घालून बारीक करा. यानंतर ते गाळून घ्या. यानंतर याचे सेवन करा. याशिवाय तुम्ही गाजराचा रस देखील पिऊ शकता. तुम्ही रोज सकाळी याचे सेवन करू शकता.