जेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर

| Updated on: Nov 19, 2019 | 7:00 PM

जेसीबीने बैलाची हत्या केल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील इंदापूरचा असल्याची माहिती समोर आली आहे (JCB Kills Bull). याप्रकरणी इंदापूर (Indapur) तालुक्यातील पोंदवडी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, क्रूरतेचं कारण समोर
Follow us on

इंदापूर : जेसीबीने बैलाची हत्या केल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील इंदापूरचा असल्याची माहिती समोर आली आहे (JCB Kills Bull). याप्रकरणी इंदापूर (Indapur) तालुक्यातील पोंदवडी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवण पोलिसांनी गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे या दोघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 27 ऑक्टोबरला या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने पिसाळलेल्या बैलाला निर्घृणपणे ठार केले (JCB Kills Bull Video).

पिसाळलेल्या बैलाची जेसीबीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचा एक व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता (JCB Kills Bull Video). तसेच, बैलाला ठार केल्यानंतर पिसाळलेल्या बैलापासून सुटका झाल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुण्याच्या इंदापूरचा असल्याचं आता समोर आलं आहे.

या व्हिडिओमध्ये दिसणारा बैल हा पिसाळलेला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये त्य़ाच्यामुळे भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बैलाला काही क्षणातच ठार केले. यावेळी कुणीही या बैलाबाबत सहानुभूती दर्शवली नाही, उलट गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बैल हा शेतकऱ्याचा सोबती मानला जातो. दिवसभर हा बैल शेतकऱ्याच्यासोबत शेतात कबाड कष्ट करत असतो. प्रत्येक शेतकरी बैलांचा आपल्या मुलाबाळांप्रमाणे संभाळ करतात. बैलाला दैवत माणून बैलपोळ्याला हार-फुलांनी सजवून त्यांच्यावर भंडाराची उधळण केली जाते. वाजत-गाजत मोठ्या उत्साहात मिरवणुकही काढत जाते. बैल आणि शेतकऱ्यांचे नाते अतूट असते, असं मानल्या जाते. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्य़ानंतर माणसातील क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे.