Sushant Singh | फ्लॅटमधील घडामोडी ते रियासोबतचं नातं, सुशांतचा रुममेटवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती

सीबीआयने सुशांतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीवर प्रश्नांची सरबत्ती केली (Siddharth Pithani CBI inquiry in Sushant Case).

Sushant Singh | फ्लॅटमधील घडामोडी ते रियासोबतचं नातं, सुशांतचा रुममेटवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 11:28 PM

मुंबई : सीबीआयने अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून सीबीआयने सुशांतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीवर प्रश्नांची सरबत्ती केली (Siddharth Pithani CBI inquiry in Sushant Case). यात सुशांतच्या घरातील घडामोडी ते अगदी रियोसोबतचे सुशांतचे नाते अशा गोष्टींबाबत माहिती घेतली. सिद्धार्थ पिठाणी हा सुशांतचा मित्र होता आणि सुशांतसोबत फ्लॅटमध्येही राहायचा. ज्यादिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशीही सिद्धार्थ फ्लॅटमध्येच होता. त्यामुळे सीबीआय सिद्धार्थची कसून चौकशी करत आहे.

सुशांत सिंहनं आत्महत्या केली त्यादिवशी सिद्धार्थ पिठाणी सुशांतच्या फ्लॅटमध्ये उपस्थित होता. त्यामुळं कूक निरज सिंहनंतर त्याचीही चौकशी झाली. विशेष म्हणजे शनिवारी (22 ऑगस्ट) सिद्धार्थची 10 तास चौकशी झाली. त्यानंतरही सीबीआयने पुन्हा सिद्धार्थला चौकशीसाठी बोलावलं.

सीबीआयनं सिद्धार्थला पहिला प्रश्न विचारला, ‘तू कधीपासून सुशांतला ओळखतो?’ यावर सिद्धार्थ पिठाणीनं मी एप्रिल 2019 पासून सुशांतचा रुममेट असल्याचं उत्तर दिलं. यानंतर रिया चक्रवर्तीनं का आणि कधी घर सोडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सिद्धार्ध म्हटला, “रियानं 8 जूनला घर सोडलं. मात्र तिनं का घर सोडले हे माहिती नाही. तिनं जाताना मला सुशांतची काळजी घे. मी फक्त एका कॉलच्याच अंतरावर आहे. त्यामुळं काही अडचण झाल्यास फोन कर एवढंच सांगितलं.”

सीबीआयने सुशांत आणि रियामध्ये काही वाद होते का असा पुढचा प्रश्न केला. यावर सिध्दार्थ म्हणाला, मला माहिती नाही. ते वरच्या मजल्यावर राहायचे. सुशांत सिंहला कुठला आजार होता का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सिद्धार्थने कोणता आजार होता हे मला माहिती नाही. मात्र तो औषध गोळ्या घ्यायचा, असं सांगितलं.

शनिवारी सीबीआयची टीम सुशांतच्या फ्लॅटवर आली. त्यावेळी सीबीआयने सिद्धार्थलाही सोबत आणलं होतं. सीबीआयच्या टीमनं सुशांतचा डमी पुतळा आणून आत्महत्येचं रिक्रिएशन केलं. त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थलाही सोबतच ठेवलं होतं. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी सिद्धार्थ फ्लॅटमध्येच असल्यानं त्या दिवशी काय काय झालं? याची पूर्ण माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घेतली.

विशेष म्हणजे आत्महत्येनंतर सुशांतच्या रुमचा दरवाजा बंद असल्यानं चावीवाल्यालाही सिद्धार्थ पिठाणीनंच कॉल केला होता. चावीवाल्यानेही याला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थ पिठाणी यांचा फोन आला होता आणि त्यांनी लवकर येण्यास सांगितले. या कामाचे 2 हजार रुपयेही त्यांनीच दिल्याची माहिती चावीवाल्याने दिली होती. सिद्धार्थ पिठाणी सुशांतच्या जवळचा मित्र होता. एवढंच नाही तर तो सुशांतच्याच फ्लॅटवर राहायचा. सुशांतबद्दल सिद्धार्थ एवढं कोणीच सांगू शकणार नाही. त्यामुळंच फ्लॅटमधल्या घडामोडीपासून ते रियासोबतच्या नात्याबाबत सीबीआय सिद्धार्थला बोलतं करत आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांतच्या फलॅटसंदर्भात मालक संजय लालवानींची चौकशी

Sushant Singh Case | सुशांत आत्महत्याप्रकरणात सीबीआयकडून सीन रिक्रिएट, सिद्धार्थ पिठाणी, नीरज आणि दीपेशची तीन तास चौकशी

संबंधित व्हिडीओ :

Siddharth Pithani CBI inquiry in Sushant Case

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.