‘ठाकरे’तील ‘हटाव लुंगी’वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच ‘ठाकरे’ला विविध अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे. आधी संभाजी ब्रिगेडने सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला असताना, आता सिनेमातील ‘हटाव लुंगी’ शब्दावरुन सेन्सॉर बोर्डानेही आक्षेप नोंदवला आहे. सेन्सॉर बोर्डाचा नेमका आक्षेप काय? ‘ठाकरे’ सिनेमातील […]

'ठाकरे'तील 'हटाव लुंगी'वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच ‘ठाकरे’ला विविध अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे. आधी संभाजी ब्रिगेडने सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला असताना, आता सिनेमातील ‘हटाव लुंगी’ शब्दावरुन सेन्सॉर बोर्डानेही आक्षेप नोंदवला आहे.

सेन्सॉर बोर्डाचा नेमका आक्षेप काय?

‘ठाकरे’ सिनेमातील वादग्रस्त ‘हटाव लुंगी’ या शब्दांवर सेन्सॉरचा आक्षेप आहे. ‘हटाव लुंगी’ हे शब्द म्युट करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या निर्मात्यांना सुचवलं आहे. ‘हटाव लुंगी’ या शब्दांमुळे दक्षिण भारतीय समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे मत सेन्सॉर बोर्डाने नोंदवलं आहे.

दरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपांवर सिनेमाचे निर्माते अपील करणार असल्याची माहिती मिळते आहे. पुढील 24 तासात या संदर्भात निर्माते निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

ठाकरेप्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेड आक्रमक

येत्या 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ठाकरे’ सिनेेमाची निर्मिती शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात विशेष आकर्षण म्हणजे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने केली आहे, तर अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची भूमिका साकारली आहे.

बाळासाहेबांचा शिवसेना स्थापन करण्याआधीचा काळा आणि शिवसेना स्थापन केल्यानंतरचा काळ, असा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. मात्र, सिनेमात नेमके कोणते प्रसंग आहे, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळू शकेल. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.