ऑगस्टपासून केंद्राचं पथक महाराष्ट्रात फिरकलंच नाही, 38 हजार कोटीही मिळाले नाही; मुख्यमंत्र्यांकडून पोलखोल

| Updated on: Oct 23, 2020 | 3:20 PM

राज्यात ऑगस्टपासून नैसर्गिक संकटं सुरू आहे. वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र केंद्र सरकारचं पथक अजूनही पाहणी करण्यासाठी राज्यात आलं नाही, असा गौप्यस्फोट करतानाच केंद्राने राज्याचे थकलेले हक्काचे 38 हजार कोटी रुपये लवकरात लवकर द्यावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

ऑगस्टपासून केंद्राचं पथक महाराष्ट्रात फिरकलंच नाही, 38 हजार कोटीही मिळाले नाही; मुख्यमंत्र्यांकडून पोलखोल
Follow us on

मुंबई: राज्यात ऑगस्टपासून नैसर्गिक संकटं सुरू आहे. वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र केंद्र सरकारचं पथक अजूनही पाहणी करण्यासाठी राज्यात आलं नाही, असा गौप्यस्फोट करतानाच केंद्राने राज्याचे थकलेले हक्काचे 38 हजार कोटी रुपये लवकरात लवकर द्यावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. (central government didn’t give gst return to maharashtra says cm uddhav thackeray)

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याकडे किती येणं बाकी आहे याचीही माहिती दिली. केंद्राकडे राज्याची मोठी रक्कम थकीत आहे. निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्याने केंद्राकडे 1 हजार 65 कोटीची मागणी केली होती. पण वादळ येऊनच चार महिने झाले तरी अद्याप हे पैसे राज्याला आलेले नाहीत. मात्र, तरीही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. ऑगस्टमध्येही पूर्व विदर्भात पूर आला होता. त्यासाठी आपण केंद्राकडे 800 कोटीची मागणी केली होती. पण केंद्राने ते पैसे दिले नाहीत. केंद्राकडे एकूण 38 हजार कोटी बाकी आहे. हे सर्व पैसे राज्याच्या हक्काचे आहेत. तेही अजून मिळालेले नाहीत. त्यासाठी केंद्राला अनेकदा स्मरणपत्र आणि पत्र पाठवली, त्यावर अजून काही झालेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्याला जूनपासून आपत्तीचा सामना करावा लागत आहे. या काळात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आले. पण ऑगस्टपासून आतापर्यंत केंद्राचं पथक अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेलं नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. दिवाळीपर्यंत ही मदत देऊ. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. (central government didn’t give gst return to maharashtra says cm uddhav thackeray)

केंद्राच्या नियमानुसार, बागायती आणि कोरडवाहूसाठी 6 हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी त्यांनी केलीय.

अशी मिळेल मदत…

1. शेतीपिकासाठी : जिरायत व बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)

2. फळपिकांसाठी : फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करम्यात येईल)

3. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल

4. रस्ते पूल – 2635 कोटी

5. नगर विकास – 300 कोटी

6. महावितरण उर्जा – 239 कोटी

7. जलसंपदा – 102 कोटी

8. ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – 1000 कोटी

9. कृषी शेती घरांसाठी – 5500 कोटी

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

Live Update : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पवारांसोबत तासभर चर्चा, खडसेंच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते ताटकळत

(central government didn’t give gst return to maharashtra says cm uddhav thackeray)