AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. (CM Uddhav Thackeray Big Announcement)

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
| Updated on: Oct 23, 2020 | 3:14 PM
Share

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. दिवाळीपर्यंत ही मदत देऊ. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray Big Announcement for Rain affected areas and farmers package aid) 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.

केंद्राच्या नियमानुसार, बागायती आणि कोरडवाहूसाठी 6 हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

साधारणपणे ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 30 हजार 800 कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. ९ हजार ८०० कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत.  राज्याचं केंद्राकडून जवळपास ३८ हजार कोटी रुपये एकूण येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळ – १ हजार ६५ कोटी रुपये बाकी, पूर्व विदर्भात पूर – ८०० कोटी रुपये बाकी आहेत. याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पण पैसे आलेले नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

कसं असणार 10 हजार कोटींचं पॅकेज?

राज्य सरकारची नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

1. शेतीपिकासाठी : जिरायत व बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल) 2. फळपिकांसाठी : फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करम्यात येईल) 3. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल 4. रस्ते पूल – 2635 कोटी 5. नगर विकास – 300 कोटी 6. महावितरण उर्जा – 239 कोटी 7. जलसंपदा – 102 कोटी 8. ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – 1000 कोटी 9. कृषी शेती घरांसाठी – 5500 कोटी

“ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु पण केंद्राकडून पाहणीसाठी पथक आलेलं नाही. राज्यात संकटांची मालिका सुरुच आहे.  राज्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये देण्याची राज्याची घोषणा केली आहे. पिकं, रस्ते, वीजेचे खांब, खरडून गेलेली जमीन अशा सगळ्यांसाठी ही मदत आहे.”

“दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करु. सध्या परिस्थिती कठीण, राज्याकडेही पैसा नाही. पण अशा स्थितीतही राज्य शेतकऱ्यांना मदत करत आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून गेली होती. तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पाण्यात वाहून गेली होती. पुराचे पाणी शिरल्याने विहीर गाळाने भरुन गेल्या होत्या. याशिवाय, पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठीही वैरण शिल्लक राहिलेली नाही. (CM Uddhav Thackeray Big Announcement for Rain affected areas and farmers package aid) 

संबंधित बातम्या : 

अतिवृष्टीग्रस्तांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आजच बैठक घेणार, अजितदादाही बैठकीला उपस्थित राहणार

पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका, संभाजीराजेंचं भाजपकडे बोट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.