नवरात्रीत सोनसाखळी चोरण्यासाठी दिल्लीहून मुंबईत; पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

| Updated on: Oct 27, 2020 | 5:03 PM

नवरात्रोत्सवात मुंबईत सोनसाखळ्या चोरण्यासाठी हा सराईत चोर मुंबईत आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे

नवरात्रीत सोनसाखळी चोरण्यासाठी दिल्लीहून मुंबईत; पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
Follow us on

मुंबई : सोनसाखळींवर डल्ला मारुन पोलिसांच्या रडारवर आलेल्या नवी दिल्लीतील (Chain Snatchers Arrested) एका कुविख्यात सोनसाखळी चोराला मुंबईत अटक करण्यात आली आहे. मालाड पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून मोठ्या शिताफिने दोनजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवरात्रोत्सवात मुंबईत सोनसाखळ्या चोरण्यासाठी हा सराईत चोर मुंबईत आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे (Chain Snatchers Arrested).

मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या 18 ऑक्टोबरला सोनसाखळी चोरीची एक घटना घडली होती. यावेळी हे चोरटे एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून बाईकवरुन पळून गेले होते. याबाबतची तक्रार मिळताच मालाड पोलीस उपनिरीक्षक नागनाथ बनसोडे यांनी आपल्या पथकासोबत घटनास्थळी जाऊन तपास करण्यास सुरुवात केली. जवळच्या एका सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना काही पुरावे मिळाले. त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी मुख्य आरोपी मुख्य आरोपी राजेश खच्चर हा खासकरुन दिल्लीहून मुंबईला नवरात्रीदरम्यान चोरी करण्यासाठी आला होता. त्याने दिल्लीमध्ये आतापर्यंत 40 चोऱ्या केल्या असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मालाड पोलिसांनी या आरोपींकडून चोरीच्या 27 ग्रॅम सोनसोखाळ्या आणि एक बाईक जप्त केली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Chain Snatchers Arrested

संबंधित बातम्या :

पुण्यात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त, कात्रजमध्ये धाडसी कारवाई

युटयूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपींना बेड्या