शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साधेपणाने, खासदार संभाजीराजे शिवप्रेमींचं प्रतिनिधित्व करणार

| Updated on: May 31, 2020 | 8:05 PM

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर होणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साधेपणाने, खासदार संभाजीराजे शिवप्रेमींचं प्रतिनिधित्व करणार
Follow us on

पुणे : कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक (Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Ceremony) यंदा साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर होणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक होणार आहे. समस्त शिवप्रेमींचं प्रतिनिधित्व खासदार संभाजीराजे करणार (Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Ceremony) आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी विश्वास दर्शवत ग्रीन सिग्नल दिल्याचं संभाजीराजांनी सांगितलं. ‘एकच धून सहा जून, आता शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात’, असे त्यांनी म्हटलं.

शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमींनी गडावर न येता आपल्या गडावर म्हणजेच घरी शिवराज्याभिषेक साजरा करावा, असं आवाहन संभाजीराजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. प्रत्येकानं आपल्या घरावर भगवा झेंडा लावावा. महाराजांची प्रतिमा, पुतळ्यास अभिवादन करावं. मनातून आणि हृदयातून साजरी करावी, असं आवाहन त्यांनी केलं. त्याचबरोबर फेसबुक लाईव्ह किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घरबसल्या तुम्हाला ते पाहता येईल, असं नियोजन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यावर सध्या कोरोनाचं संकट आहे‌. अशा परिस्थितीत लाखोंच्या संख्येने रायगडवर जाणं योग्य नाही. महाराज प्रजादक्ष होते म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतरही महाराज मनामनात आहे. आपण महाराजांचे मावळे असल्याने आपल्यावर आणखी जबाबदारी असल्याचं संभाजी महाराजांनी सांगितलं (Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Ceremony).

2008 आली मेघडंबरीत छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी शिवप्रेमीं मोठ्या संख्येने हजेरी लावतात. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सव स्वरुप आलं.

शिवभक्तांच्या सहकार्याने 2008 ला मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शिवभक्त रायगडावरील हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी आतुर झालेले असतात.

यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करुन जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाज हित डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती (Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Ceremony) त्यांनी केली आहे.