PHOTO : शिवसेनेची तिथीनुसार शिवजयंती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण
शिवसेनेने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन आणि संसदिय कामकाज मंत्री अनिल परबही उपस्थित होते.
- शिवसेनेने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.
- त्यानंतर याच ठिकाणी महाराजांच्या मागे निर्माण करण्यात येणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृती बांधकामाचं भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
- यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन आणि संसदिय कामकाज मंत्री अनिल परबही उपस्थित होते.
- यावेळी शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी छत्रपती शिवरायांचा जयजयकार केला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला






