बाजारात बंदी असतानाही चिनी लसणाची सर्रास विक्री, असा ओळखा चिनी लसूण?

| Updated on: Oct 31, 2019 | 6:17 PM

वाशीतील घाऊक बाजारात काही व्यापाऱ्यांकडे या चिनी लसणाची विक्री केली जात आहे. नुकंतच हा धक्कादायक प्रकार उघडकीस (China Garlic in market) आला आहे.

बाजारात बंदी असतानाही चिनी लसणाची सर्रास विक्री, असा ओळखा चिनी लसूण?
Follow us on

नवी मुंबई : भारतीय बाजारपेठांमध्ये दोन वर्षांपूर्वी चिनी मालावर बंदी घालण्यात आली (China Garlic in market)  होती. मात्र असे असतानाही वाशीतील घाऊक बाजारात काही व्यापाऱ्यांकडे या चिनी लसणाची विक्री केली जात आहे. नुकंतच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा लसूण वेगळ्या बॅगमध्ये भरुन विक्रीस आणला जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली (China Garlic in market) आहे.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी लसूण बाजारात आणताना तो वेगवेगळ्या बॅगेत भरुन विक्रीस आणला जातो. त्या लसणाचे नाव अद्याप कोणत्या व्यापाराला माहित नाही. मात्र तो परदेशातून, इस्त्राईल, ईराणमधून आणलेला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लसूण आणलेल्या बॅगेवरुन त्याची खरी ओळख पटत नाही.

चीनवरुन आयात केलेला लसूण हा भारतीय लसणापेक्षा चवीला वेगळा लागतो. त्याच्या पाकळ्या मोठ्या असतात. त्यामुळे या लसणाची एक पाकळी हातात धरुन तो सहजपणे कापता येतो. या लसणाचे दर आपल्या लसणापेक्षा कमी असतात. यामुळे भारतीय लसणांच्या किमतीत घट होते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. या कारणामुळे दहा वर्षांपूर्वी या लसणाच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यानंतर हा लसूण आपल्याकडील बाजारपेठेत बंद करण्यात आला होता. मात्र असे असतानाही या लसणाची छुप्या पद्धतीने विक्री होत (China Garlic in market) आहे.

मात्र आता बाजाराबाहेरील काही व्यापाऱ्यांनी हा चिनी लसूण वाशीतील बाजारात विक्रीसाठी आणला आहे. याची पॅकिंग बॉक्स आणि वेगळ्या पिशव्यांमधून केली जाते. याबाबत व्यापाऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यामुळे व्यापारी खरी माहिती लपवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सध्या भारतीय लसणाचे दर घाऊक बाजारात 100 ते 160 रुपये किलो आहे. तर या चिनी लसणाचे दर 120 ते 130 रुपये किलो आहेत. या लसणाचे दर भारतीय लसणापेक्षा कमी असल्याने त्याची विक्री होते आणि आपल्याकडील लसणाचे भाव पडतात. दरम्यान अशाप्रकारे बंदी असलेला माल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बाजारातील काही व्यापाऱ्यांनी केली आहे.

बाजारात आता इस्त्राईल आणि इराणमधून लसूण बाजारात आला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. हा लसूण चीनमधील आहे का याची माहिती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया बटाटा बाजाराचे उपसचिव के. बी. पवार यांनी दिली.