AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या हॉटेलात आता चिनी नागरिकांना नो एण्ट्री, हॉटेल असोसिएशनची घोषणा

दिल्लीतील कोणत्याही हॉटेल, गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंटमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश द्यायचा (Chinese people no entry in Delhi hotel) नाही

दिल्लीच्या हॉटेलात आता चिनी नागरिकांना नो एण्ट्री, हॉटेल असोसिएशनची घोषणा
| Edited By: | Updated on: Jun 25, 2020 | 5:28 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील कोणत्याही हॉटेल, गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंटमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश द्यायचा (Chinese people no entry in Delhi hotel) नाही, असा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेने घेतला आहे. त्यासोबतच या संघटनेकडून चिनी वस्तूंवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. भारताच्या सीमेवर चीनकडून सुरु असलेल्या हालचालींच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात (Chinese people no entry in Delhi hotel) आला आहे .

हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये यापुढे एकाही चिनी नागरिकाला राहता येणार नाही. दिल्लीत जवळपास 3000 बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊस आहे. ज्यामध्ये 75 हजार खोल्या आहेत.

“चीन ज्या प्रकारे आपल्या देशाच्या सीमेवरील जवानांवर आणि देशावर हल्ले करत आहे. याचा दिल्लीतील सर्व हॉटेल व्यावसायिकांना राग आहे. त्यासोबत या संघटनेने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका, असं आवाहनही देशातील नागरिकांना केले आहे”, असं हॉटेल आणि रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे महामंत्री महेंद्र गुप्ता यांनी सांगितले.

“कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केलेल्या अवाहनामुळे देशातील विभिन्न वर्गातील लोकं एकत्र येऊ चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यासोबत आता संघटनेकडून ट्रान्सपोर्ट, शेतकरी, हॉकर्स, लघु उद्योग, महिला उद्योजकांच्या राष्ट्रीय संघटनेला भेटून त्यांनाही या उपक्रमात जोडणार आहे”, असं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

“या उपक्रमात देशातील माध्यम क्षेत्र, खासगी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग, आयएयस आणि आयपीएस अधिकारी, आयआरएस, इंडियन फोरस्ट सर्व्हिसचे अधिकारी, सरकारी कर्मचारी, धर्मगुरु, मोटिवेशनल स्पीकर्स, सेवानिवृत्त न्यायाधीश, चार्टर्ड अकाऊंटेंट, कंपनी सेक्रेटरी, सेवानिवृत्त अधिकारी, लष्करातील निवृत्त जवान, पोलीस, सीआरपीएफ, आयटीबीपी, पॅरा मिलिट्री फोर्स यांनाही या उपक्रमात जोडले जावे”, असंही बीसी भरतिया आणि प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

बीसी भरतिया म्हणाले, “यावेळी चीनला धडा शिकवण्यासाठी भारताचे सर्व लोक एकत्र येणार आणि डिसेंबर 2021 पर्यंत चीनवरुन येणाऱ्या सामानमध्ये एक लाख कोटी रुपयांची कमी आणणार आणि जे पैसे चीनच्या वस्तू खरेदीला लागतात ते एक लाख कोटी रुपये भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी लावणार”.

संबंधित बातम्या :

7 लाख कोटीचा व्यवहार, चीनसोबतचे 70 वर्षांचे संबंध उद्ध्वस्त, भारतात कोणत्या क्षेत्रात किती भागीदारी?

स्पेशल रिपोर्ट: डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.