महाराष्ट्र कोरोनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात, लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जा : मुख्यमंत्री

कोरोनाची लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवा. ही लपवण्याची गोष्ट नाही," असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray Corona) म्हणाले.

महाराष्ट्र कोरोनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात, लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जा : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 9:41 PM

मुंबई :महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या अत्यंत महत्त्वाच्या (CM Uddhav Thackeray Corona)  टप्प्यात आहे. आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस वाढतात. मात्र यातील दिलासादायक बाब म्हणजे जे कोणी वेळेत आले त्यातील काहींना डिस्चार्ज दिला आहे. या अर्थ असा की जर तुम्हाला लक्षणे दिसली, तर ताबडतोब डॉक्टरकडे जा,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“हे संकट घराबाहेर आहे, घरात नाही. त्यामुळे (CM Uddhav Thackeray Corona) लोकांनी गर्दी करु नये. तसे कोरोनाची लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवा. ही लपवण्याची गोष्ट नाही,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“दिवसेंदिवस रस्त्यावरची गर्दी कमी होत आहे. रस्त्यावर किंवा घराबाहेर पडू नका हा नियम नागरिक पाळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काहींनी कारण नसताना दुकानात झुंबड केली. हे सर्व आपल्याला टाळायला हवे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“कृपा करुन शिस्त पाळा. भाज्यांची आवाक होत आहे. डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करु नका,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“राज्यभर शिवभोजन केंद्र ही ३ तास सुरु राहणार, केंद्रांची संख्या वाढवावी. मात्र त्या ठिकाणी गर्दी करु नका,” असेही मुख्यमंत्री म्हणाले

“कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील रेशनवरील धान्य त्यांना तात्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.”

“लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे, हि परिस्थिती नाईलाजाने उदभवली आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे. मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवभोजन उद्दिष्ट्य वाढवले

“या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी, त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही १ लाख वाढवत आहोत . त्याचा लाभ घ्यावा. मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल, असे करू नका,” असेही ते म्हणाले.

“रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही निर्देश दिले आहेत. पोलीस, महसूल, सहकार, पणन आणि कामगार विभाग याना यादृष्टीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

“जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून , टँकर्स, कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यातून एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो.”

“ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या असे साखर कारखान्यांना सांगितले आहे. हे कामगार आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा.”

दूध संकलन व्यवस्थित होईल

“ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल जेणे करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही दिले आहेत.”

“परराज्यातून आपल्या राज्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत, कुणी इथे काम करणारे कामगार आणि श्रमिक आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी प्रशासन घेईल. काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे.”

खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी

“खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी आहे. या लढाईत त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबादारी आमची आहे.”

रक्तदान शिबिरे घ्यावी

“राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असे मी आवाहन करतो.”

“कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार हि जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. पोलिसाना सहकार्य देखील आम्ही सूचना दिल्या आहेत”

“शिर्डी संस्थानाने 51 कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत, सिद्धीविनायकने देखील 5 कोटी देऊ केले आहेत अशी माहिती देताना ते म्हणाले कि वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो. मात्र योग्य उपचार झाले पाहिजेत,” असेही ते (CM Uddhav Thackeray Corona) म्हणाले

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.