शाळा उघडल्या नाहीत, तर डिजिटल क्लासरुमचे नियोजन करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांचा अभ्यास करुन आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले (CM Uddhav Thackeray on Students Education)

शाळा उघडल्या नाहीत, तर डिजिटल क्लासरुमचे नियोजन करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
| Updated on: May 19, 2020 | 1:00 PM

मुंबई : ‘कोरोना’ संकटामुळे शाळा प्रत्यक्ष उघडता आल्या नाहीत, तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्यासाठी प्रणाली विकसित करावी लागेल, त्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. (CM Uddhav Thackeray on Students Education Directs to arrange Digital Classroom if Schools wont open amid Corona Pandemic)

‘कोरोना’च्या प्रादुर्भावानंतर शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. शाळा सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु राहण्यासाठी तज्ञांशी चर्चा करुन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले

विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु होऊ शकली नाही, तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाचा विचार करावाच लागेल. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरुम्स पर्याय वापरता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं, जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार : मुख्यमंत्री

राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ई-लर्निंग डिजीटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांचा अभ्यास करुन आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘कोरोना’चा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होईल. जागतिक स्तरावर बदल होऊ शकतात. परंतु, मुलांचे शैक्षणिक वर्ष प्रभावित होऊ नये. म्हणूनच शैक्षणिक वर्ष नियमितपणे सुरु करण्यासाठी सर्वसमावेशक योजना विकसित केली जावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. (CM Uddhav Thackeray on Students Education Directs to arrange Digital Classroom if Schools wont open amid Corona Pandemic)

मला महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, असे उद्धव ठाकरे काल म्हणाले होते.

“जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरु होणार, काहींच्या परीक्षा राहिल्या आहे. शैक्षणिक वर्ष कसं सुरु करणार, शाळा कशा सुरु करणार, परीक्षा कशा होणार, ऑनलाईन सुरु करणार की प्रत्यक्ष शाळा सुरु करणार, हे सर्व मोठे विषय आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. (CM Uddhav Thackeray on Students Education Directs to arrange Digital Classroom if Schools wont open amid Corona Pandemic)