अमेरिकासुद्धा आपल्याकडे औषध मागतेय, आपण जिंकणारच : उद्धव ठाकरे

| Updated on: Apr 11, 2020 | 5:54 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला (CM Uddhav Thackeray on Corona).

अमेरिकासुद्धा आपल्याकडे औषध मागतेय, आपण जिंकणारच : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : “कोरोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे (CM Uddhav Thackeray on Corona). सर्व नेते एकत्र आले आहेत. ही एकजूट अशीच राहिली आणि ती केवळ तात्पुरता न राहता सदासर्वदा राहिली तर आपला देश या कोरोनाच्या संकंटावर मात करेलच पण आपला देश या जगातील महासत्ता बनेल. आज अमेरिकेलासुद्धा आपल्याकडून औषधे मागावी लागत आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray on Corona).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“आज एक गोष्ट मी बघितली संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. मात्र सगळेजण राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सगळेजण पंतप्रधान मोदींसोबत आहेत आणि मोदी आपल्यासोबत आहेत. सगळे राज्य सरकारे केंद्र सरकारसोबत आहेत आणि केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत आहे. केंद्र आपल्याला काय हवं ते विचारत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आपल्याला आता राजकारण करण्याची वेळ नाही. राजकारण तर आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. किती वेळ राजकारण करणार आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय? या विषयात राजकारण नको. पक्षीय राजकारण इथे थांबली पाहिजेत”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“अमेरिकेलासुद्धा आज आपल्याकडून औषधे मागावी लागत आहेत. एकूणच सगळे जण अडचणीत आहेत. प्रत्येकाला भोगावं आणि सोसावं लागत आहेत. कुणालाही ही बंदनं आनंदादायी नाहीत. ना तुम्हाला आणि ना मला. मी सुद्धा बऱ्याच गोष्टी घरातून करत आहे. वर्क फ्रॉम होम चालू ठेवा. ही मोठी आणि अडचणीची परिस्थिती आहे. 14 एप्रिलनंतर किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागेल. काही ठिकाणी बंधनं आहेत. मात्र आता त्यापेक्षा कठोर बंधन करावे लागतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.