नारळाचे पाणी लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा

नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात.

नारळाचे पाणी लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा
नारळ पाणी

मुंबई : नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. नारळ पाणी पिणे सर्वांसाठीच चांगले आहे. मात्र, लहान मुलांसाठी हे नारळ पाणी अमृतपेक्षा कमी नाहीये. (Coconut water is beneficial for the health of children)

-उन्हाळ्याच्या हंगामात नारळाचे पाणी जास्त प्रमाणात पिल्याने आपले शरीर हायड्रेट राहते आणि यामुळे पुष्कळ पौष्टिक घटक देखील मिळतात. मात्र, जास्त करून लहान मुलांना नारळाचे पाणी दिले जात नाही. उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते.

-नारळाचे पाणी पिण्यामुळे मुलाच्या त्वचेला ओलावा येतो आणि त्वचेतून जादा तेल निघून जाते. नारळाच्या पाण्यात बॅक्टेरियाविरोधी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे त्वचेचा संसर्गापासून बचाव करतात.

-नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत आणि निरोगी बनतात. मुलांना मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील असतो. नारळ पाणी पिण्यामुळे मुलांमध्ये तो धोका देखील कमी होतो.

-सकाळी रोज नारळ पाणी पिल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते आणि यामुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. यामुळे लहान मुलांना अनेक आजारांपासून वाचू शकता.

-नारळाच्या पाण्यात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे केसांत अनेक प्रकारचे पोषक घटक तयार होत असतात. ही पाणी आपल्या स्काल्पला मॉइश्चराइझ करण्याचे काम करते.

संबंधित बातम्या : 

(Coconut water is beneficial for the health of children)