शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कंपन्यांचे अधिकारी बांधावर; शिरूरमध्ये यंदा उसाचे विक्रमी उत्पादन?

ऊसाच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी खते औषधे जमिनीची मशागत कशी करायची? | Sugarcane farmers

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कंपन्यांचे अधिकारी बांधावर; शिरूरमध्ये यंदा उसाचे विक्रमी उत्पादन?
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:27 AM

पुणे: शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथील शेतकऱ्यांना ऊसाचे (Sugarcane) चांगले उत्पादन घेता यावे, यासाठी काही कंपन्यांचे अधिकारी बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत.एकरी उसाचे उत्पादन १०० टनाच्या पुढे कसे घ्यावे? व ऊस पिकाला खते, औषधे, पाण्याचे नियोजन कशापद्धतीने करावे, याबाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती दिली जात आहे. (Sugarcane farmers in Pune)

तेज अ‍ॅग्रोटेक कंपनीच्या माध्यमातून शिरूर तालुका प्रमुख बापु कुटे व त्यांचे सहकारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन उसाच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी खते औषधे जमिनीची मशागत कशी करायची? पाण्याचे व्यवस्थापन यांचे नियोजन करून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन कसे घ्यावे, याचे मार्गदर्शन करत आहेत.

या पध्दतीने नियोजन केल्यामुळे या भागातील शेतकरी एकरी १२५ टनापर्यंत ऊस उत्पादन यशस्वी ठरले आहेत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पिकांचे योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होणार असल्याचे मार्गदर्शक अधिकार्‍यांनी सांगितले.

ऊसाचे दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

उसाचा दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी सोलापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले. त्यांच्याकडून बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर ऊसाची वाहतूक रोखण्यात आली. यावेळी आंदोलकांकडून रस्त्यावर टायर पेटवण्यात आले. सोलापूरात सलग दुसऱ्या दिवशीही ऊसदर आंदोलन सुरुच आहे.

ऊसाला वाढीव 14 टक्के एफआरपी द्यावा- राजू शेट्टी

ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही.

गेल्यावर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने एफआरपी 100 रूपयांनी वाढवला आहे. परंतु, 14 टक्क्यानुसार एफआरपीची रक्कम 382 रुपयांनी वाढली पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान 200 रुपयांनी तरी एफआरपी वाढवावा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

(Sugercane farmers in Pune)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.