AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शशी थरुर तराजूतून पडले, डोक्याला सहा टाके!

तिरुअनंतपुरम (केरळ) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस उमेदवार शशी थरुर हे मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना पडले. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत शशी थरुर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, जखम झालेल्या ठिकाणी 6 टाके पडले आहेत. तिरुअनंतपुरम येथील मंदिरात तुलाभराम पूजा करत असताना, या पूजेच्या विधीचा एक भाग म्हणून […]

शशी थरुर तराजूतून पडले, डोक्याला सहा टाके!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

तिरुअनंतपुरम (केरळ) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस उमेदवार शशी थरुर हे मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना पडले. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत शशी थरुर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, जखम झालेल्या ठिकाणी 6 टाके पडले आहेत.

तिरुअनंतपुरम येथील मंदिरात तुलाभराम पूजा करत असताना, या पूजेच्या विधीचा एक भाग म्हणून ते फळ आणि मिठाईंच्या तराजूत तुला करत होते. त्यावेळी ते पडले आणि त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला.

तुलाभरम पूजा केरळमधील मोजक्याच मंदिरात केली जाते. वजनाइतकी मिठाई किंवा फळं या देवाला अर्पण केली जातात. त्यामुळे ज्या मंदिरात तुलाभरम पूजा केली जाते, त्या मंदिरांच्या बाहेर मोठमोठे तराजू ठेवलेले पाहायला मिळतात.

शशी थरुर हे माजी केंद्रीय मंत्री असून, केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार आहेत. शिवाय, यंदाही ते याच लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राजशेखरन रिंगणात आहेत. राजशेखरन यांनी नुकतेच मिझोरमच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. शशी थरुर सलग दोनवेळा तिरुअनंतपुरम येथून खासदार आहेत. त्यामुळे यंदा शशी थरुर हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत.

केरळमध्ये एकाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. 23 एप्रिल रोजी केरळमध्ये मतदान पार पडणार असून, 23 मे रोजी सर्व निकालांसोबतच निकाल लागणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली