Corona | देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ, 24 तासात 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासात तब्बल 6 हजार 201 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सध्या 1 लाख 19 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Corona | देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ, 24 तासात 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण
| Updated on: May 23, 2020 | 12:06 AM

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 6 हजारांच्या वर नवे (Corona Latest Updates ) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 5 दिवसांपासून 5 हजारांनी होणारी नव्या रुग्णांची वाढ आता 6 हजारांवर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितानुसार, 22 मे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांची आतापर्यंतची (Corona Latest Updates ) सर्वाधिक वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात तब्बल 6 हजार 201 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सध्या 1 लाख 19 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 49 हजार 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 66 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सर्वाधिक रुग्णांचा विचार केला, तर अर्थातच महाराष्ट्रातच अधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 44 हजार 582 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित कुठे?

– तामिळनाडूत 13 हजार 967 कोरोनाबाधित

– गुजरातमध्ये 12 हजार 910 कोरोनाग्रस्त

– दिल्लीत 12 हजार 319 कोरोना रुग्ण

– राजस्थानमध्ये 6 हजार 281 कोरोनाबाधित

Corona Latest Updates

कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ

सध्या संसर्गाचा वेग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांसाठी काहीशी दिलासादायक बाब आहे.

रुग्ण वाढीचा दर सध्या 4.2 टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 40 टक्के इतका झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा दर 13 वरुन 17 दिवसांवर गेला आहे. त्यातही सध्या देशात कोरोनाचा व्हायरसचा जो संसर्ग वाढतो आहे, त्यात लक्षणं नसणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 69 टक्के रुग्णांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणंच नाहीत. त्यामुळे ज्या रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. अशात 10 दिवस कोणतीही लक्षणं न दिसल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात (Corona Latest Updates) येईल.

संबंधित बातम्या :

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 22 पक्षाचे नेते बैठकीला हजर

OLA | तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी, उत्पन्न घटल्याने ‘ओला’वर वाईट वेळ

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी