मोठी बातमी ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात जानेवारीपासून लसीकरण?, आदर पुनावाला यांचे संकेत

| Updated on: Dec 13, 2020 | 8:26 PM

जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात लसीकरणास सुरुवात होऊ शकते, असे आदर पुनावाला म्हणाले. (corona vaccination adar poonawalla)

मोठी बातमी ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात जानेवारीपासून लसीकरण?, आदर पुनावाला यांचे संकेत
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशातही लसीकरणास सुरुवात होऊ शकते. तसे संकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिले. ते एका जागतिक व्यापारविषयक बैठकीत (global business summit) बोलत होते.(corona vaccination will start in india from january said adar poonawalla)

“कोरोना विषाणूचा संसर्ग थोपवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार करण्यात येत असलेल्या कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी मिळू शकते. ही परवानी केंद्र सरकार डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देऊ शकते. तसेच, 2021 सालाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात संपूर्ण भारत देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते,” असे पुनावाला म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्ड लस

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारतीय कंपनीकडून कोव्हीशिल्ड ही लस तयार करण्यात येत आहे. या लसीची निर्मिती ऑक्सफर्ड आणि अ‌ॅस्ट्राझेनेका या दोन संस्थांनी केलेली आहे. या संस्थांसोबत सीरमने करार करुन लसीच्या उत्पादनासाठी परवानगी घेतलेली आहे.(corona vaccination will start in india from january said adar poonawalla)

केंद्र सरकार 30 ते 40 कोटी डोस खरेदी करणार

आदर पुनावाला यांनी यावेळी सांगितलं की, सीरमतर्फे सरकार तसेच खासगी बाजारात विकण्यासाठी कोरोना लसीची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी जुलै महिन्यापर्यंत केंद्र सरकार 30 ते 40 कोटी डोस सीरम कडून विकत घेणार आहे. तसेच केंद्रीय आणि कुटंब कल्याण मंत्रालय देशातील 20 ते 30 टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या तयारीत आहे.

लसीकरणासाठी दिल्लीत 2 लाख नागरिकांची नोंदणी

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. देशात लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच लस मिळावी म्हणून दोन लाखांपेक्षा अधिक दिल्लीकरांनी आपले नाव नोंदवले आहे. असे असले तरी, दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात सर्वांत आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधातत्मक लस देण्यात येईल. याविषयी अधिक माहिती देताना, दिल्लीचे आरोग्यमंत्री संत्येंद्र जैन यांनी सांगितलं की, “दिल्लीतील आरोग्य सेवक, फ्रन्टलाईन वर्कर्सना तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांना लस देण्यास प्राध्यान दिले जाईल.” (corona vaccination will start in india from january said adar poonawalla)

दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण देशात येत्या जानेवारी महिन्यापासून लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता आदर पुनावाला यांनी वर्तवल्यानंतर नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

संबंंधित बातम्या :

‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

Corona Vaccine | कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

(corona vaccination will start in india from january said adar poonawalla)