AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine | कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्रालयाने दिले आहे. (news Corona vaccine permission)

Corona Vaccine | कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराबाबतची 'ती' बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
| Updated on: Dec 09, 2020 | 10:28 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी नाकारली आहे, अशी बातमी काही माध्यमांनी दिली होती. ती पूर्णत: खोटी असल्याचे सांगत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आम्ही परवानगी नाकारली नसल्याचे स्पष्ट केले आहे. (The Union Ministry Has clarified that the nws about denial of permission for Corona vaccine is false)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील तसेच काही विदेशी कंपन्यांनी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी या कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे अर्जही केलेले आहेत. या कंपन्यांची मागणी केंद्र सरकारने फेटाळल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. ही बातमी खोटी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसे ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने आपल्या स्पष्टीकरणात सांगितलंय की, “सीरम इंन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांची मागणी फेटाळ्याची बातमी चुकीची आहे.” तसेच, मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर बातमीचा स्क्रीनशॉट टाकत ती खोटी असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

लसीबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही

दरम्यान, कोरोना लसीच्या वापराची परवानगी देताना कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचं आयसीएमआरचे(ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलेलं आहे. तसेच, लस शरीरासाठी किती हानिकारक आहे?, किती फायदेशीर आहे? या गोष्टींचा अभ्यास करुनच तिला परवानगी देण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

कोणत्या कंपन्यांचे कोरोना लसीच्या वापरासाठी अर्ज

फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या कंपन्यांनी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्याची मागणी केलेली आहे. या सर्व कंपन्यांच्या अर्जावर केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेची (CDSCO) बैठक झाल्यानंतर नि़र्णय घेतला जाईल. 4 डिसेंबर रोजी फायझरने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितलेली आहे. या कंपनीला बहरीन आणि यूकेमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आलेली आहे. 6 डिसेंबर रोजी पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितलेली आहे. ही लस ऑक्सफोर्ड आणि अ‌ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली आहे.

संबंधित बातमी :

Rajesh Tope | कोरोना लसीकरणाच्या नियोजनात महाराष्ट्र नंबर एकवर : राजेश टोपे

Corona Vaccine | केंद्राचा कोरोना लसीकरणाचा प्लॅन तयार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर, कोणती लस जास्त प्रभावी?

(The Union Ministry Has clarified that the news about denial of permission for Corona vaccine is false)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.