‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

भारतातील काही राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील लोकांना कोरोनाची मोफत लस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यात कोणत्या राज्यांचा समावेश आहे, पाहूया

'या' राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई: कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे ते कोरोना लसीवर. ब्रिटन, कॅनडामध्ये कोरोना लसीला परवानगी देण्यात आली आहे. तर भारतातही सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे भारतातही कोरोनाची लस लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(In which states will the corona vaccine be free?)

दरम्यान भारतातील काही राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील लोकांना कोरोनाची मोफत लस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यात कोणत्या राज्यांचा समावेश आहे, पाहूया

केरळ

आपल्या राज्यातील लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी जाहीर केलं आहे. सरकार कोरोना लसीकरणावेळी एकाही व्यक्तीकडून पैसे घेणार नाही. आम्ही मोफत लसीकरण मोहिमेसाठी पाऊल उचलत आहोत, असं पिनराई विजयन शनिवारी म्हणाले.

बिहार

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या घोषणापत्रात बिहारच्या जनतेला मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या JDU चा विजय झाला आहे. त्यामुळे आता बिहारच्या नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार आहे.

तामिळनाडू

बिहारमध्ये भाजपनं कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केल्यानंतरच अनेक राज्यांमध्ये लस मोफत देण्याची मागणी जोर धरु लागली होती. समाजमाध्यमांवरही मोफत लस देण्याची मागणी वाढली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारनेही मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर तामिळनाडूतील नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा तामिळनाडू सरकारने ऑक्टोबरमध्ये केली आहे.

मध्यप्रदेश

बिहार आणि तामिळनाडूमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही मोठी घोषणा केली. राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा चौहान यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांनीही ऑक्टोबरच्या शेवटी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल असं सांगतानाच त्यांनी लसीकरणाबाबत सरकारच्या मोहिमेचीही माहिती दिली होती.

केंद्र सरकारही मोफत लस देणार?

मोदी सरकारमधील मंत्री प्रताप सारंगी यांनी बिहार निवडणुकीदरम्यान मोफत लसीची घोषणा करताना संपूर्ण देशातही लस मोफत दिली जाईल असं म्हटलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील सरकारशी चर्चा सुरु आहे आणि लोकांच्या आरोग्यावर कोरोना लसीची किंमत ठरेल असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप कोरोना लस मोफत देण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, राज्यात केंद्रानं दिलेल्या निर्देशानुसार लसीकरणाची संपूर्ण तयारी सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच राज्यात आरोग्य कर्मचारी, पोलिसांना सर्वात आधी लस दिली जाईल, अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

Corona Vaccine | कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

In which states will the corona vaccine be free?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI