हँडवॉशची चढ्या दराने विक्री, बारामतीच्या मॉलवर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 03, 2020 | 12:17 AM

बारामतीच्या एमआयडीसीतील सिटी सेंट्रल मॉलवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Handwash selling in high rate Baramati) आहे.

हँडवॉशची चढ्या दराने विक्री, बारामतीच्या मॉलवर गुन्हा दाखल
Follow us on

बारामती : हँडवॉशची चढ्या दराने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या (Handwash selling in high rate Baramati) बारामतीच्या एमआयडीसीतील सिटी सेंट्रल मॉलवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात ग्राहकांना वेठीस धरुन जादा रक्कम घेणाऱ्यांना या कारवाईमुळे चांगलाच चाप बसला आहे.

संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा (Handwash selling in high rate Baramati) सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वत्र भाजीपाला, किराणा दुकाने आणि अन्य गरजेच्या वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. पण काही दुकानदार ग्राहकांना वेठीस धरून त्यांच्याकडून जादा रक्कम वसूल करत आहेत. अशा अनेक तक्रारी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे आल्या होत्या. सिटी सेंट्रल मॉलमध्येही ग्राहकांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले होते.

या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कांबळे यांनी महसूल खात्यातील दोन अधिकाऱ्यांना या मॉलमध्ये बनावट ग्राहक म्हणून पाठवले. त्यांनी या मॉलमधून 189 रुपये किमतीच्या हँडवॉशची खरेदी केली. मात्र त्यांच्याकडून 280 रुपये घेण्यात आले. या अधिकाऱ्यांनी या रक्कमेचे बिलही घेतले.

विशेष म्हणजे या हँड वॉशच्या पॅकिंगवर मॉलने त्या किमतीचे स्टीकर्स लावले होते. याबद्दल या अधिकाऱ्यांनी मॉलचे मालक वैभव राजकुमार गांधी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आमच्याकडे असाच माल येतो असे सांगितले. त्यावरून या दोन्ही अधिकाऱ्यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सीटी सेंट्रल मॉलचे मालक वैभव राजकुमार गांधी यांच्यावर कलम 420, 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51(ब), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2,3,4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्य आणि देशात सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे ग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या मॉल चालकावर कारवाई झाल्यामुळे बारामतीतील अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमतीपेक्षा अतिरिक्त रक्कम घेणाऱ्या दुकानदारांना चाप बसणार (Handwash selling in high rate Baramati) आहे.