क्रेडिट-डेबिट कार्डच्या नियमात बदल, काय आहेत फायदे-तोटे?

| Updated on: Mar 16, 2020 | 11:19 AM

आरबीआयचे हे नवे नियम तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डला आणखी सुरक्षित आणि सुविधाजनक बनवण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.

क्रेडिट-डेबिट कार्डच्या नियमात बदल, काय आहेत फायदे-तोटे?
Follow us on

नवी दिल्ली : क्रेडिट आणि डेबिट कार्डसंबंधी काही नियम (Credit-Debit Card Rules) आजपासून बदलत आहेत. नवे नियम कार्डला आणखी सुरक्षित आणि सुविधाजनक बनवण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांचे काही फायदे आहेत, तसेच काही (Credit-Debit Card Rules) तोटेही आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डने होणारे व्यवहार सोपे आणि अधिक सुरक्षित बनवण्यासाठी या दोन्ही कार्ड्सना इश्यू/रिइश्यू करण्यासाठी नवे नियम अंमलात आणले आहेत. याबाबत आरबीआयने 15 जानेवारीला नोटिफिकेशन जारी केलं. हे नवे नियम प्रिपेड गिफ्ट्स कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाही.

हेही वाचा : Yes Bank | ‘रिलायन्स समुहा’चे अध्यक्ष अनिल अंबानींना ‘ईडी’चे समन्स

फक्त देशात व्यवहारासाठी कार्ड वापरता येणार

आरबीआयने बँकांना सूचना केल्या आहेत, डेबिट आणि क्रेडिट कार्ड इश्यू/रिइश्यू करताना ते फक्त भारतातील एटीएम आणि पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्सवर (पीओएस) व्यवहारासाठी लागू करा. नव्या नियमानुसार, आता खातेधारक डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर फक्त एटीएम आणि पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्सवर करु शकतील.

परदेशात आणि ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळी सुविधा घ्यावी लागणार

जर ग्राहक ऑनलाईन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस व्यवहार किंवा परदेशी (Credit-Debit Card Rules) व्यवहार करु इच्छितात तर त्यांना या सेवा सुरु कराव्या लागतील. जुन्या नियमांनुसार, या सर्व सुविधा कार्डसोबतच यायच्या. मात्र, आता या सुविधांसाठी ग्राहकांना विनंती करावी लागेल.

सर्व कार्ड्सवर नियम लागू होणार

जर तुम्ही डेबिट-क्रेडिट कार्ड ग्राहक आहात आणि तुम्ही अद्याप तुमच्या कार्डने कुठलंही ऑनलाईन, कॉन्टॅक्टलेस आणि परदेशी व्यवहार केले नसतील. तर तुमच्या कार्डवरील या सेवा 16 मार्चपासून आपोआप रद्द होतील. आरबीआयने सर्व बँकांना म्हटलं आहे की, सात दिवसात मोबाईल अप्लीकेशन, लिमिट मॉडिफाय करण्यासाठी बँकेने अनेबल आणि डिसेबल पर्याय उपलब्ध करण्यास सांगितले आहे.

कार्ड ऑन-ऑफ करण्याची सुविधा

आथा क्रेडिट कार्ड यूझर्स कुठल्याही क्षणी आपल्या कार्डला सुरु-बंद करु शकतात किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये बदल करु शकतात. यासाठी ते मोबाईल अप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंक किंवा आयव्हीआरचा आधार घेऊ शकतात.

सुरक्षेचे उपाय

जर ग्राहक आपल्या कार्डच्या स्टेटसमध्ये काही बदल करत असेल किंवा दुसरेकाही करण्याचा प्रयत्न करत असेल तर बँक एसएमएस/इमेलद्वारे ग्राहकांना सतर्क (Credit-Debit Card Rules) करेल आणि माहिती पाठवेल.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानात प्रतितोळा सोन्याची लाखाकडे वाटचाल, आजचा सोन्याचा दर….!

मार्चमध्ये 19 दिवस बँकांना सुट्टी, सर्व बँक व्यवहार राहणार बंद

दुकानदाराकडून GST बिल घ्या आणि 1 कोटी कमवा, केंद्र सरकारची अनोखी लॉटरी योजना

पेट्रोल तब्बल 6 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं, कारण…