सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला, सोन्याच्या दरात किंचित वाढ, पेट्रोल-डिझेल 9 महिन्यांच्या निचांकी दरावर

कोरोनाचा कहर आणि अडचणीतील YES बँकेच्या फटक्यामुळे, भारतीय शेअर बाजारात (Sensex down by over 1400 points) आज आठवड्याची सुरुवातच कोसळून झाली.

सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला, सोन्याच्या दरात किंचित वाढ, पेट्रोल-डिझेल 9 महिन्यांच्या निचांकी दरावर

मुंबई : कोरोनाचा कहर आणि अडचणीतील YES बँकेच्या फटक्यामुळे, भारतीय शेअर बाजारात (Sensex down by over 1400 points) आज आठवड्याची सुरुवातच कोसळून झाली. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी निर्देशांक तब्बल 1419 अंकांनी कोसळून 36 हजार 157.53 अंकांवर पोहोचला. त्यानंतरही ही घसरण सुरुच होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 800 अकांची घट पाहायला मिळाली. (Sensex down by over 1400 points)

क्रूड ऑईलच्या किमती घसरल्या

आखाती देश आणि रशियातील तेलाच्या किमतीवरुन सुरु असलेल्या वादामुळे, क्रूड ऑईलच्या किमती तब्बल 30 टक्क्यांनी घसरल्या. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात पाहायला मिळाला. तेल-गॅस कंपन्यांचे शेअर्स घसरले.

कोरोनाचाही कहर

याआधी कोरोनाच्या प्रभावाने शुक्रवारी शेअर मार्केट बंद होताना पाहायला मिळाला होता. बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती.  चीनमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्याने, त्याचा परिणाम आयात-निर्यातीवर झाला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकत घट झाली होती.

सोन्याच्या किमतीत वाढ

दरम्यान, सोन्याच्या किमतीत आज 13 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘मनी कंट्रोल’च्या वृत्तानुसार, 24 कॅरेट सोन्याचा आजचा मुंबईतील दर 44,170 आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 43 हजार 170 इतका आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Prices Today) किमतीत कपात झाली आहे. पेट्रोलचा आजचा भाव 9 महिन्यांचा निचांकी दर गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात 23 ते 25 रुपयांची कपात झाली आहे. तर डिझेल दरात 25 ते 26 पैशांची कपात झाली आहे. मुंबईत पेट्रोलाचा दर 76.29 रुपये लिटर तर डिझेल 66.24 रुपये प्रति लिटर असा दर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *