वो निकले थे तवायफों के कोठे… शरद पवार गटाच्या नेत्याचा टोला कुणाला?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची शिवसुराज्य यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात ही यात्रा पोहचली असता तेथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणे झाली. यात अजित पवार यांच्या भरपूर टिका करण्यात आली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. सोलापूरातील मेळाव्यात युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी जोरदार भाषण ठोकले. आपल्या भाषणात मेहबूब शेख म्हणाले की जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा. ही लबाड पुतण्यांची गँग एकत्र आलीय आणि आता गुलाबी जॅकेट घालून एकत्र आलेत. पुतण्या तोच पुढे जातो जो काकाचे ऐकतो. तो पुतण्या आता गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर फिरत आहे. गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा छान मात्र काकांच्या बाबत माझ्या मनात घाणच…घाण अशा शेलक्या शब्दात मेहबूब शेख यांनी अजितदादांवर जोरदार हल्ला चढविला. तुम्ही जर साफ असतात तर विजय दादा सारखं स्वाभिमान दाखवत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले नसतात असेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की तुम्ही लीड दिलं म्हणून बीडचं पार्सल बीडला पाठवलं आणि आता इंदापूरच पार्सल इंदापूरला पाठवायचे आहे. मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने हे बाहेरून आले आहेत.बारामतीमध्ये आष्टीतील सुप्रिया सुळे नामक महिलेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ करायला यशवंत माने यांनी पुढाकार घेतला एवढे हे कृतघ्न आहेत. जेव्हा पवार साहेबांना सोडून सर्वजण जात होते तेव्हा सोलापूर जिल्ह्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी साथ दिली. दिल्लीच्या रंगा बिल्ला विरोधात पवार साहेब आपल्यासाठी लढतायत, गुजरातला सोन्याची लंका करा, पण महाराष्ट्रातील लूट करून लंका बनवित असाल तर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला सोडणार नाहीत असाही टोला मेहबूब शेख यांनी यावेळी लगावला.
हमारा दौर आयेगा
ना खाऊंगा, ना खाणे दूंगा म्हणणारे सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ यांचे मंत्री, प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभेतील खासदार आहेत असा उल्लेख करीत मेहबूब शेख यांनी शेरच पेश केला. ते म्हणाले की,’ वो निकले थे तवायफो के कोठे बंद करणे सिक्को की खनक सुनकर खुद मुजरा कर बैठे’, कुछ देर की खामोशी हैं फिर शोर आयेगा, अरे गद्दारो तुम्हारा सिर्फ वक्त आया हैं हमारा दौर आयेगा अशा एकामागोमाग एक शायरी पेश करीत त्यांना माहोल तयार केला.