
सांगली : घराच्या छतावर मगर, रस्त्यावर मगर, शिवारात मगर, स्वच्छ पाण्यात तोंडातून मुलीला घेऊन जाणारी मगर. 23 जुलैचा महापूर ओसरू लागताच सांगलीत अजस्र मगरीचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमातून झळकले. यात एखाद्या ठिकाणी खरोखरच मगरीने हल्ला केला असल्याचं समोर आलं नाही. कारण प्रलयंकारी महापूराने सैरभैर झालेल्या मगरी स्वतःचा जीव वाचवत आहेत. मात्र, यामुळेच या मगरी समाज माध्यमात अनेकांच्या स्टेटसवर झळकल्या. यानंतर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर मानव-मगर संघर्ष निर्माण करण्यात आला.
साधारण मे-जून हा मगरीचा विणीचा हंगाम. या काळात ती नदीकाठी असणाऱ्या जमिनीमध्ये खड्डा करुन आपली अंडी घालून पूरत असते. त्यानंतर अंडी उबून आतून पिल्लं ओरडेपर्यंत मगर थांबून वाट बघते. पिलांचा आवाज आला की ती जागा उकरून अंडी फोडून पिलांना घेऊन जाते. यावर्षी मगरींनी आपली वीण उंचीवर घातली. आमणापूर येथील पीर परिसरात, काळ्या ओढ्याजवळ मगरीने वीण उंचावर घालून चांगला पाऊस आणि महापूराचा संकेत दिले. मात्र, माणसाने या संकेतांकडे दुर्लक्ष केले, असं मत निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी व्यक्त केलं.
मगरीकडून मे महिन्यातच अतिवृष्टी, महापूर येण्याचे संकेत, मानव प्राणी संघर्षात त्याकडे दुर्लक्ष : प्राणीतज्ज्ञ#Rain #HeavyRain #Flood #Sangli #Animal #Nature pic.twitter.com/iERfJUPLJ3
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 7, 2021
कोणताही वन्यजीव हा विणीच्या काळातच अधिक आक्रमक असतो. तसेच मगरी एप्रिल ते जून दरम्यान आक्रमक असतात. इतरवेळी ती तिच्या अधिवासात सुस्त असते. मात्र माध्यमांनी निर्माण केलेल्या संघर्षामुळे आपण तिच्या संकेताकडे दुर्लक्ष केले आहे, असं मत प्राणीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Crocodiles give signal of Heavy rain and flood in may 2021 claim in Sangli