Mumbai | सध्या सोन्याचे दर स्थिर, सोशल मीडियावरील माहिती चुकीची

मुंबईत सोन्याचा दर स्थिर असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर घसरले आहेत, मात्र दसरा-दिवळीच्या मुहूर्तावर पुन्हा दर वाढणार असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

मुंबई: सोन्याच्या भावात घसरण झाल्याच्या अनेक बातम्या सध्या येत आहे. मात्र यंदाच्या वर्षात सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी आता दर स्थिर असल्याचं कळतं आहे. मुंबईत सोन्याचा दर स्थिर असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर घसरले आहेत, मात्र दसरा-दिवळीच्या मुहूर्तावर पुन्हा दर वाढणार असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर सोन्याचे दर उतरल्याचे अनेक मेसेज फिरत आहेत, मात्र या अफवा असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. सोन्याच्या दराबाबत आम्ही मुंबईतील सराफा व्यापारी भरत जैन यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी ते म्हणाले की, ‘पहिल्या लॉकडाऊनवेळी जो भाव होता, त्या भावापेक्षा सध्या सोन्याचा भाव कमी आहे, मात्र गेल्या काही काळात सोन्याचा भाव घसरला नाही. गेल्या 2 महिन्यात सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे, मात्र फार मोठा फरक पडलेला नाही. दररोज सोन्याच्या भावात 500 ते 700 फरक होतच असतो, लॉकडाऊनआधी सोनं 58000 ते 60000 रुपये प्रतितोळा होतं, त्या तुलनेत आता सोन्याचा दर कमी आहे.’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI