कोरोनाचा धोका वाढणार, दुर्गंधी पसरेपर्यंत वॉर्डमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह पडून

| Updated on: Oct 08, 2020 | 1:14 PM

मृतदेहाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे रुग्णालयातील इतर रुग्ण हे रात्रभर रुग्णालयाच्या आवारात बसून असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पप्पू पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे.

कोरोनाचा धोका वाढणार, दुर्गंधी पसरेपर्यंत वॉर्डमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह पडून
Follow us on

जळगाव : कोरोनाच्या या कठीण काळात वारंवार प्रशासनाचा भोंगळा कारभार समोर आला. जळगावमध्येही अशीच जीवघेणी घटना समोर आली आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकरा घडला आहे. गेल्या दहा दिवसांपासून जामनेरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. पण अक्षरश: दुर्गंधी पसरेपर्यंत मृतदेह हा इतर रुग्णांच्या वॉर्डमध्ये पडून होता. (dead body of corona positive patient was kept in general ward in jalgaon)

जिल्हा रुग्णालयात असे प्रकार होणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच रुग्णाटा मृत्यू झाला. यानंतर कोरना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह रात्रभर इतर रुग्ण असलेल्या बोर्डमध्ये ठेवण्यात आला होता. त्या मृतदेहाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे रुग्णालयातील इतर रुग्ण हे रात्रभर रुग्णालयाच्या आवारात बसून असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पप्पू पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे.

रुग्णालयातील कोविड सेंटरला स्टाफ कमी असल्यामुळे मृतदेहाला नेण्यासाठी कोणीही नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनायक सोनवणे यांनी दिली आहे. पण यातून इतर नागरिकांचे हाल होत असल्याचं समोर आलं आहे. खरंतर, कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. पण याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे.

दरम्यान, राज्यात काही केल्या कोरोनाचा धोका कमी होण्याचं नाव घेत नाही. रोज नव्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. अशात राज्य आता अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे कोविडचा संसर्ग वेगाने पसरण्याची शक्यता जास्त असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून संपूर्ण आरोग्य व्यवस्था पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेला भार आपण समजूच शकतो. पण अशा घटना थेट जीवाशी खेळ करतात. त्यामुळे याकडे गांभार्याने लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या –

gold and sliver rate : सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, 50 हजारांहूनही कमी 10 ग्रामची किंमत

ज्या मुलीवर कुटुंबाने केले अंत्यसंस्कार, ती 4 वर्षानंतर घरी परतली