शिजणाऱ्या पोषण आहारात पडून 6 वर्षांच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

| Updated on: Aug 11, 2019 | 10:47 PM

राजस्थानच्या (Rajasthan) दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या शाळेच्या स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पोषण आहारात (Mid Day Meal) पडून 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

शिजणाऱ्या पोषण आहारात पडून 6 वर्षांच्या विद्यार्थीनीचा मृत्यू
Follow us on

जयपूर: राजस्थानच्या (Rajasthan) दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या शाळेच्या स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पोषण आहारात (Mid Day Meal) पडून 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मांडरवार पोलीस स्टेशन अंतर्गत रशीदपुरा येथे ही घटना घडली.

अल्का बैरवा ही 6 वर्षांची मुलगी राजकीय आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात पहिलीच्या वर्गात शिकत होती. 6 ऑगस्टला शाळेत पोषण आहार शिजवण्याचे काम सुरु होते. सर्व मुलं स्वयंपाकघरात पोषण आहार खाण्यासाठी गेले. दरम्यान अचानक एक विद्यार्थीनी पोषण आहार शिजत असलेल्या भांड्यात पडली.

स्वयंपाकघरातील या भांड्यात दाळ शिजत होती. शाळेतील शिक्षकांनी तात्काळ पीडित मुलीला दौसा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला जयपूर येथील सवाई मान सिंह (SMS Hospital) रुग्णालयात पाठवण्यात आले. मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिचं शरीर शिजणाऱ्या पोषण आहारामुळे 30 टक्के भाजलं होतं. 4 दिवसांपर्यंत या मुलीने मृत्यूशी झुंज दिली. अखेर शनिवारी (10 ऑगस्ट) मुलीने अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान मुलीच्या शरीरात संसर्ग झाला होता. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली.

मुलीच्या वडिलांनी शाळा प्रशासनाविरोधात बेजबाबदारपणाचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दौसा येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई करत शाळेच्या पोषण आहाराचे प्रभारी ब्रजभूषण यांना निलंबित केलं आहे. तसेच लहान मुलं पोषण आहाराला स्वयंपाकघरात गेले तेव्हा तेथे कुणीही उपस्थित का नव्हते याच्याशी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.