अयोध्येतील राम नगरीत नवा विक्रम, पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन

| Updated on: Oct 27, 2019 | 11:45 AM

संपूर्ण देशभरात आज दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामानगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन (Deepotsava celebration ayodhya)  करुन एक नवा विक्रम रचण्यात आला.

अयोध्येतील राम नगरीत नवा विक्रम, पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन
Follow us on

लखनऊ : संपूर्ण देशभरात आज दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामानगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन (Deepotsava celebration ayodhya)  करुन एक नवा विक्रम रचण्यात आला. या दीप प्रजल्वनासाठी मोठ्या प्रमाणात येथे राम भक्त उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. दीप प्रजल्वन (Deepotsava celebration ayodhya) केल्यामुळे रामाची नगरी प्रकाशमय झाली होती.

भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे राम भक्त हजर होते. यावेळी राम भक्त समितीकडून श्रीराम आणि रामायणाचे 11 प्रसंग प्रस्तुत करण्यात आले. रामाचीनगरी येथे एकूण पाच लाख 51 हजार दीप प्रज्वलन केले होते. तसेच इतर दीड लाख दीप मठ आणि मंदीर येथे लावण्यात आले होते.

“रामाच्या परंपरेवर सर्वांना गर्व असला पाहिजे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांचा विकास होत आहे. यापूर्वीचे सरकार अयोध्येच्या नावाखाली घाबरत होते. पण माझ्या कार्यकाळात मी अनेकदा येथे आलो”, असं यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी 226 कोटींच्या परियोजनांचे लोकार्पण केले. तसेच मोठ्या प्रमाणात येथे लोक दीपोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

“पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी राम राज्य साकारलेले आहे. मोदी यांनी भारताची परंपरा जागतिक पातळीपर्यंत पोहचवली आहे. भारत जगात विश्वगुरुच्या रुपात स्थापन होत आहे. भारत कुणाचा नाद करत नाही, पण भारताचा कुणी नाद केला, तर त्याला सोडत नाही”, असं योगी म्हणाले.