चाकाखाली लिंबू, विमानावर कुंकवाने ओम, फ्रान्समध्ये राजनाथ सिंहांकडून राफेल पूजा!

| Updated on: Oct 08, 2019 | 8:05 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी फ्रान्समध्ये या विमानातून (Rafale combat jet ) पहिली भरारी घेतली. दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताच्या ताब्यात राफेल विमान मिळालं.

चाकाखाली लिंबू, विमानावर कुंकवाने ओम, फ्रान्समध्ये राजनाथ सिंहांकडून राफेल पूजा!
Follow us on

पॅरिस : भारतीय वायूसेनेची ताकद आज आणखी वाढली आहे. कारण फ्रान्सने बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत RB 001 राफेल (Rafale combat jet ) हे विमान भारताला सोपवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी फ्रान्समध्ये या विमानातून (Rafale combat jet ) पहिली भरारी घेतली. दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताच्या ताब्यात राफेल विमान मिळालं.

राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी भारतीय परंपरेप्रमाणे या विमानाची पूजा केली. दसऱ्याला शस्त्रपूजेची परंपरा आहे. शिवाय एखादं वाहन घरी आल्यानंतर ज्याप्रमाणे त्यावर कुंकवाने ओम काढलं जातं, चाकाखाली लिंबू ठेवून हार घातला जातो, अगदी तसंच राजनाथ सिंहांनी केलं. राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्येही भारतीय परंपरा दाखवत, राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू आणि विमानावर ओम काढलं. राफेल विमानाची पूजा करुन, त्यानंतर राजनाथ सिंह यानी त्यातून भरारी घेतली.

एकीकडे राफेलची पूजा केली असली, तरी राजनाथ सिंहांच्या या कृत्यावर सोशल मीडिवारुन टीकाही केली जात आहे. ही सुद्धा एकप्रकारची अंधश्रद्धा असून, चुकीची पद्धत पाळली जात असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

राफेल विमान

मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. मोदी सरकारने केलेल्या करारावरुन काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण कोर्टाने मोदी सरकारला क्लीनचीट दिली.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे?
भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला. ही विमानं फ्रान्सची दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. ही विमानं सप्टेंबर 2019 मध्ये भारताला मिळणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या 

राफेल परीक्षेत मोदी पास, व्यवहारात कोणताही संशय नाही: सुप्रीम कोर्ट  

18 च्या किंमतीत 36 विमानं मिळतायत, गैरव्यवहाराचा संबंधच नाही : दसॉल्ट 

 राफेल करार कसा झाला? सरकारने सुप्रीम कोर्टात ए टू झेड सांगितलं!