कंडक्टरच्या क्रूरतेचा कहर, कोरोनाच्या संशयाने चालत्या बसमधून फेकलं, मुलीचा मृत्यू

| Updated on: Jul 08, 2020 | 8:32 PM

बस कंडक्टरने कोरोनाच्या संशयातून एका 19 वर्षीय मुलीला चालत्या बसमधून बाहेर ढकलून दिलं (Delhi Womens Commission notice to UP police on Mandawali girl death).

कंडक्टरच्या क्रूरतेचा कहर, कोरोनाच्या संशयाने चालत्या बसमधून फेकलं, मुलीचा मृत्यू
Follow us on

लखनऊ : कोरोना संकटकाळात डॉक्टर, नर्सेस, सरकार आणि प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र, तरीही देशात माणुसकी हरवत चालली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीला बस कंडक्टरने कोरोनाच्या संशयातून चालत्या बसमधून बाहेर ढकलून दिलं. यात मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला (Delhi Womens Commission notice to UP police on Mandawali girl death).

या घटनेप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस पाठवली आहे. मृत मुलगी पूर्व दिल्लीतील मंडालवी भागात वास्तव्यास होती. तिची प्रकृती बरी नव्हती. मात्र, तिची कोराना चाचणी केली असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. त्यामध्ये तिचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला होता. त्यानंतरच ती बसने प्रवास करत होती. यावेळी तिच्यासोबत कुटुंबातील एक व्यक्तीदेखील होती, अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बसने प्रवास करत असताना मृत मुलीला चक्कर येत होते, अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आला. याच संशयातून बस ड्रायव्हरने मुलीला मथुरा टोल प्लाझाजवळ चालत्या बसमधून खाली ढकलून दिलं. चालत्या बसमधून खाली पडल्याने मुलीच्या डोक्याला मोठी जखम झाली. डोक्याला जबर मार बसल्याने मुलीचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये दोषींवर कारवाई केली का? गुन्हा दाखल केला का? याप्रकरणी कुणाला अटक केली? असे प्रश्न विचारले आहेत. याशिवाय अटक केली नसेल तर त्यामागील कारण विचारले आहे. त्याचबरोबर अटक केली असेल तर त्याची सविस्तर माहिती मागितली आहे (Delhi Womens Commission notice to UP police on Mandawali girl death).

हेही वाचा :

Cabinet Decision | मोफत धान्य, मजुरांना भाड्याने घर, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

शिवभोजन थाळी आणखी तीन महिन्यांसाठी 10 ऐवजी 5 रुपयांना, मंत्रिमंडळ बैठकीतील 9 निर्णय

Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV | ‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ