Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV | ‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.

Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV | 'राजगृह'वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 7:21 PM

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात दोन संशयितांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. तसेच तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागले आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.  (Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised CCTV Footage)

नेमकं काय घडलं? 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी तोडफोड केली. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास एक निळ्या रंगाचे शर्ट घातलेला तरुण घटनास्थळी आला. त्या तरुणाने राजगृहाच्या गेटसमोर येत दगडफेक केली. जवळपास आठ-नऊ दगड त्याने राजगृहाच्या दिशेने भिरकावले. यानंतर हा तरुण गेट उघडून आत शिरला. त्याने कुंड्यांचे नुकसान केले, हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

राजगृहाला कायमस्वरुपी पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान काल घडलेल्या प्रकरणानंतर राजगृहाला कायमस्वरूपी पोलिसांचा बंदोबस्त द्यावा अशी मागणी अनेक नेत्यांनी केली होती. ही मागणी तात्काळ मंजुरी करण्यात आली आहे. त्यानुसार आता राजगृहाला कायमस्वरूपी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येणार आहे. त्यानुसार वर्षातील 365 दिवस आणि 24 तास पोलीस बंदोबस्त असणार आहे.

राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.

दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. (Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised CCTV Footage)

संबंधित बातम्या : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.