AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड
| Edited By: | Updated on: Jul 08, 2020 | 6:34 PM
Share

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. (Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised by unidentified persons)

दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.

दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. घटनेची सखोल चौकशी करुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती त्यांनी गृहमंत्र्यांना केली.

माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गृहमंत्र्यांना केली.

भीमराव (दादासाहेब) आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही घटनेचा निषेध नोंदवला.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

(Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised by unidentified persons)

VIDEO : 

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.