Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन

| Updated on: Jun 13, 2020 | 4:08 PM

दिलासादायक बाब म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला.

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन
Follow us on

बीड : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Family Members Report) यांना कोरोनाची लागण झाल्याचं (Corona Virus) समोर आलं. मात्र, दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे देखील होम क्वारंटाईन झाले. त्यानंतर आज पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील होम क्वारंटाईन (Dhananjay Munde Family Members Report) झाले आहेत.

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकच नाही, तर अधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला. तर, धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 64 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक होम क्वारंटाईनमध्ये

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत जे पोलीस सुरक्षेसाठी होते त्यांच्या संपर्कात आल्याने बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्वत: होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या स्टाफमधले पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत. शिवाय, धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे (Dhananjay Munde Family Members Report).

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

12 जून रोजी धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. परळीतील जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र, मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी (8 जून) मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उद्घाटन देखील केले होते. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाला अनेकजण उपस्थित होते. सध्या धनंजय मुंडेंवर मुंबईत उपचार सुरु आहेत.

ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर 12 जून रोजी धनंजय मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचे 87 रुग्ण

बीडमध्ये सध्या कोरोनाचे 87 रुग्ण आहेत. यापैकी 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 21 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.

बीडमध्या कोरोनाचं चक्र सुरुच आहे. परळीतील रेशन दुकानदाराला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे परळी शहरातील तीन कॉलनी सील करण्यात आलं आहे. बीडच्या मसरत नगरमध्ये रुग्ण आढळल्यामुळे मसरत नगर परिसर सील करण्यात आला आहे (Dhananjay Munde Family Members Report).

संबंधित बातम्या :

Dhananjay Munde COVID | आरोग्य मंत्र्यांचा धनंजय मुंडेंना फोन, प्रकृतीबाबत राजेश टोपे म्हणतात…

धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण