लग्न मोडले, परिचारीकेचे नग्न फोटो व्हायरल, आरोपी डॉक्टर अटकेत

परिचारीकेचे नग्न फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका डॉक्टरला चंद्रपूर पोलिसांनी (Doctor viral nude photo of nurse) अटक केली आहे.

लग्न मोडले, परिचारीकेचे नग्न फोटो व्हायरल, आरोपी डॉक्टर अटकेत
| Edited By: | Updated on: Dec 29, 2019 | 10:46 PM

चंद्रपूर : परिचारीकेचे नग्न फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका डॉक्टरला चंद्रपूर पोलिसांनी (Doctor viral nude photo of nurse) अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा आरोग्य केंद्रात आरोपी डॉक्टर कार्यरत होता. आकाश जिवने असं या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून अधिक (Doctor viral nude photo of nurse) तपास सुरु आहे.

परिचारीका ही आरोपी डॉक्टर आकाश याच्या घरी आणि दवाखान्यात कामाला होती. दोन्हींकडील कामं ती पाहत होती. नुकतेच काही दिवसांपूर्वी या परिचारीकेचे लग्न ठरले होते. मात्र आरोपी डॉक्टरने मुलाच्या गावी जाऊन त्याला पीडित तरुणीचे नग्न फोटो दाखवले. त्यामुळे परिचारीकेचे लग्नही मोडले.

लग्न मोडल्याने पीडित तरुणीने कोरपना पोलीस स्टेशन गाठून डॉ. जीवने विरुद्ध रितसर तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला. दरम्यान डॉक्टर फरार झाला. पण पोलिसांनी डॉक्टरला 24 तासात अटक केली.