जादूटोण्याचा संशय, खेडमध्ये पाडव्याच्या दिवशी दोघांची हत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील औंढे येथे पाडव्याच्या दिवशी घडली. दिवाळी सणादरम्यान दोघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. नावसू वाघमारे आणि लिलाबाई मुकणे अशी हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. नावसू वाघामरे […]

जादूटोण्याचा संशय, खेडमध्ये पाडव्याच्या दिवशी दोघांची हत्या
Follow us on

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील औंढे येथे पाडव्याच्या दिवशी घडली. दिवाळी सणादरम्यान दोघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. नावसू वाघमारे आणि लिलाबाई मुकणे अशी हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत.

नावसू वाघामरे आणि लिलाबाई मुकणे हे गेल्या पाच वर्षांपासून औंढे या गावांमध्ये एकत्र राहत होते. ओढ्याच्या कडेला घर असल्यामुळे त्यांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारीचा होता. मासेमारी आणि मोलमजुरी करून हे आपले उदरनिर्वाह करत होते. पण लिलाबाई मुकणे आणि नावसू वाघमारे हे काही तरी जादूटोणा करत असून त्याच्यामुळे गावामधील लहान मुले हे आजारी आणि मृत्यूमुखी पडत असल्याचा संशय आरोपींना होता.

त्यात एका आरोपीच्या मुलीच्या पोटामध्ये दुखत होते आणि दुसऱ्या आरोपीच्या पत्नीच्या अंगावर फोड आले होते. हे सर्व कृत्य आघोरी पद्धतीने लिलाबाई मुकणे या करत आहे, असा गैरसमज झाल्याने हे हत्याकांड करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्ररकरणी खेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शेजारील गावामधील आरोपी जयतू बोरकर आणि बबन मुकणे दोघांना खेड पोलिसांनी अटक केली. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

आपण कितीही प्रगत झाल्याचा दावा केला तरी अंधश्रद्धा आणि त्याच्याशी निगडित अनेक गोष्टींवर अनेकांचा आजही ठाम विश्वास असल्याचं खेडमधल्या या दुहेरी हत्याकांडाने स्पष्ट झालंय. जादू करत असल्याच्या संशयाने झालेल्या या हत्या म्हणजे आजही आपण पुरोगामी नाही, तर मागासलेल्या विचारसरणीचे आहोत हे दाखवणाऱ्या आहेत.

पोलीस या प्रकरणाचा छडा लावतीलही, पण विचार बदलायचे कसे हाच खरा प्रश्न आहे. कारण, केवळ संशयामुळे दोन जीव घेतले गेले.