
- लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुट उंच मुर्तीचे नुकतेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस फेसबुक वॉल )

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 70 फुटी मूर्तीला 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज' असे नामकरण करण्यात आले आहे. ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस फेसबुक वॉल )

-या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. शेकडो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस फेसबुक वॉल )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 28 दिवसात आम्ही हा 70 फुटी मूर्ती उभारला आहे. ही जयंती एका विशिष्ट समाजाची नाही ही सर्व समाजाची आहे असे मत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलं आहे. ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस फेसबुक वॉल )

या महापालिकेने आमच्याकडून पैसे घेतले तेव्हा आम्ही ते पैसे भरले पण या भिकारचोट लोकांनी डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीसाठी पैसे घेतले.- कार्यक्रम संपवून जाताना प्रत्येकाने एक रुपयाची चिल्लर यांच्या तोंडावर फेका असे आवाहन आमदार संभाजी पाटील यांनी अनुयायांना केले. ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस फेसबुकवॉल )