AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईला मिळाला नवा राष्ट्रपती, अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद होणार नवे राष्ट्रपती, शेख खलिफा यांच्या निधनानंतर निर्णय

शेख मोहम्मद हे दुबईच्या सैन्यदलाचे डेप्युटी सुप्रीम कमांडर आहेत. त्यांनी इंग्लंडच्या स्टँडहर्स्टमधून रॉयल मिलिटरी अकादमीतून पदवी मिळवलेली आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये त्यांचे वडील जायेद बिन सुल्तानने त्यांना अबूधाबीचे उपयुवराज नियुक्त केले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर २००४ साली ते अबुधाबीचे युवराज झाले.

दुबईला मिळाला नवा राष्ट्रपती, अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद होणार नवे राष्ट्रपती, शेख खलिफा यांच्या निधनानंतर निर्णय
UAE new presidentImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 5:30 PM
Share

शारजाह – शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान (Crown Prince Sheikh Mohammed)संयुक्त अरबात अमिरात (UAE)चे नवे राष्ट्रपती असतील. ६१ वर्षीय या ने्तयाला देशाच्या तिसरे राष्ट्रपती (new president)होण्याची संधी मिळाली आहे. त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते शेख खलिफा यांचे भाऊ आहेत. राष्ट्रपती शेख खलिफाच्या निधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुबईतील वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

UAE strongman Sheikh Mohammed bin Zayed named new president https://t.co/CHLmpDWcmo pic.twitter.com/NgVbMPFf5B

— Reuters (@Reuters) May 14, 2022

>

दुबईच्या फेडरल सुप्रीम कौन्सिलने अबु धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद यांना राष्ट्रपती निवडले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. दुबईचे शासक शेख मोहम्मद यांच्या अध्यक्षतेत अबूधाबीत अल मुशाऱीफ पॅलेसमध्ये एक बैठक पार पडली. त्यात नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यात आली. दुबईचे शासक आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशिद उल मकतूम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांचा परिचय

शेख मोहम्मद हे दुबईच्या सैन्यदलाचे डेप्युटी सुप्रीम कमांडर आहेत. त्यांनी इंग्लंडच्या स्टँडहर्स्टमधून रॉयल मिलिटरी अकादमीतून पदवी मिळवलेली आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये त्यांचे वडील जायेद बिन सुल्तानने त्यांना अबूधाबीचे उपयुवराज नियुक्त केले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर २००४ साली ते अबुधाबीचे युवराज झाले.

दीर्घ आजाराने शेख खलिफा यांचे निधन

दुबईचे राष्ट्रपती शेख खलिफा बिन जायद अल नह्यान यांचे शु्क्रवारी १३ मे रोजी निधन झाले. शेख खलिफा यांच्या निधनानंतर युएईत ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. या काळात त्यांचा राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर असेल. तीन दिवस सर्व सरकारी कार्यालये आणि मंत्रालये बंद राहणार आहेत. यात खासगी क्षेत्रांचाही समावेश आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.