भूकंपाने पाकमध्ये इमारत कोसळून 50 जखमी, दिल्लीतही हादरे

| Updated on: Sep 24, 2019 | 5:38 PM

दिल्ली-एनसीआरमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के बसले (Delhi-NCR Earthquake). भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक कार्यालय आणि घरांतून बाहेर पडले. दिल्लीसोबतच काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाने पाकमध्ये इमारत कोसळून 50 जखमी, दिल्लीतही हादरे
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के बसले (Delhi-NCR Earthquake). भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक कार्यालय आणि घरांतून बाहेर पडले. दिल्लीसोबतच काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक दहशतीखाली आहेत. दुसरीकडे, भूकंपामुळे पाक व्याप्त काश्मीमधील मीरपूर येथे इमारत कोसळली (Building Collapsed in POK). या दुर्घटनेत 50 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

आज दुपारी 4 वाजून 35 मिनटांनी हे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील रावळपिंडी या ठिकाणी आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानला लागून असल्याने काश्मीरमध्ये भूकंपाचा जास्त परिणाम दिसून आला.

त्याशिवाय, पंजाबच्या अमृतसर, लुधियाना, चंदीगड, गुरदासपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसले. तसेच, हरियाणाच्या गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद आणि मेरठमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने किती घरांचे नुकसान झाले आहे, किती जीवीतहानी झाली आहे, याची माहिती प्रशासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

यापूर्वी 2005 मध्येही जम्मू-कीश्मीरमध्ये मोठा भूकंप आला होता. यावेळी काश्मीरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यावेळी 7.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता.