अवकाळी पावसाचा फटका; जिल्ह्यात अकराशे जनावरे दगावल्याचा अंदाज; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Dec 03, 2021 | 2:25 PM

पावसाने केलेला कहर व थंडीच्या कडाक्याचा मोठा फटका जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या हंगामाला बसला आहे. द्राक्षांच्या बांगासोबतच , हाताला आलेली कांद्याची रोप भुईसपाट झाली आहेत. गहू, हरभरा व अन्य कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हरभऱ्याच्या पिकावर बुरशी जन्य आजार निर्माण झाले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका; जिल्ह्यात अकराशे जनावरे दगावल्याचा अंदाज; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Rain update
Follow us on

पुणे – जिल्ह्यात सर्वत्र पडलेला अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालासह पाळीव जनावरांना बसला आहे. मागील दोन दिवसात पडलेली कडाक्याची थंडी , धुकं यामुळं जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 135 शेळ्या – मेंढ्यांचा दगावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कुरणांमध्ये चराईसाठी शेळ्या मेंढ्या घेऊन बाहेर पडलेल्या भटक्या मेंढपाळांना याचा मोठा फटका बसला आहे. अचानकपणे वाढलेली थंडी, धुकं व त्यात पाऊस यामुळ मेंढ्यांचा थंडीने जीव घेतला आहे. या घटनेने अनेक शेतकरी, मेंढपाळही हवाल दिल झाले आहेत.

शेतकरीही अस्वस्थ
पावसाने केलेला कहर व थंडीच्या कडाक्याचा मोठा फटका जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या हंगामाला बसला आहे. द्राक्षांच्या बांगासोबतच , हाताला आलेली कांद्याची रोप भुईसपाट झाली आहेत. गहू, हरभरा व अन्य कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हरभऱ्याच्या पिकावर बुरशी जन्य आजार निर्माण झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी तसेच शेळया- मेंढ्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

दगावलेल्या शेळ्या मेंढ्यांची संख्या
सर्वसाधारणपणे आंबेगाव तालुक्यात 10 शेळ्या , 169 मेंढ्या, शिरुरमध्ये 5 शेळ्या109 मेंढ्या , खेडमध्ये 4 शेळ्या73 मेंढ्या , जुन्नर शेळया 15 मेंढ्या 541 , हवेलीमध्ये शेळ्या 2,  मेंढ्या 17, भोर शेळी 1 मेंढया 2, मावळ शेळ्या 2 , मेंढ्या 36, बारामती शेळ्या 6 मेंढ्या 40, दौंड शेळ्या 3 , मेंढया 24, पुरंदर शेळ्या7 ,मेंढ्या 119

MTHL: मुंबई-नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे काम 60 टक्के पूर्ण

पाटणाच्या PNB मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उघडले होते खाते, 323 रुपये अजूनही जमा

अंबरनाथमध्ये 7 वर्षांची ‘फॉरेन रिटर्न’ मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन तपासणी होणार