पाटणाच्या PNB मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उघडले होते खाते, 323 रुपये अजूनही जमा

राजेंद्र प्रसाद यांनी 24 ऑक्टोबर 1962 रोजी पाटणा येथील एक्झिबिशन रोड चौकाजवळ असलेल्या पीएनबीच्या शाखेत खाते उघडले होते. 4 महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणीही आले नाही. बँकेचे मुख्य व्यवस्थापक रंजन प्रकाश म्हणाले की, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे खाते आपल्याकडे असणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

पाटणाच्या PNB मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उघडले होते खाते, 323 रुपये अजूनही जमा
rajendra prasad

पाटणा : देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निधनाला 50 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, मात्र त्यांचे खाते पाटणा येथील पंजाब नॅशनल बँकेत (PNB) आजही सुरू आहे. तरीही खात्यात 323 रुपये जमा आहेत. बँकेत जमा केलेली ही रक्कम त्यांच्या मूळ रकमेचे व्याज असते. मूळ पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) जमा करण्यात आले आहेत, जे सुमारे 7,000 रुपये होते. मंगळवारी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची 135 वी जयंती आहे.

4 महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला

राजेंद्र प्रसाद यांनी 24 ऑक्टोबर 1962 रोजी पाटणा येथील एक्झिबिशन रोड चौकाजवळ असलेल्या पीएनबीच्या शाखेत खाते उघडले होते. 4 महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणीही आले नाही. बँकेचे मुख्य व्यवस्थापक रंजन प्रकाश म्हणाले की, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे खाते आपल्याकडे असणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बँकेने त्यांच्या बचत खात्याला प्रथम ग्राहकाचा दर्जा दिलाय.

बँकेच्या मुख्यालयात असलेल्या संग्रहालयात ठेवलेल्या आठवणी

गेल्या वर्षी (2018) राजेंद्र प्रसाद यांच्याशी संबंधित सर्व आठवणी दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्यालयात असलेल्या द्वारका संग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या. ते पाहण्यासाठी लोक तिथे येतात. अनेक वर्षांपासून त्यांच्या खात्यातून कोणताही व्यवहार होत नसल्याने ते खाते डीफ म्हणून घोषित करण्यात आले, असंही रंजन प्रकाश यांनी सांगितले.

बँकेने मूळ रक्कम आरबीआयमध्ये जमा केली

त्यांच्या खात्यात जमा केलेले मूळ पैसे (सुमारे 7 हजार रुपये) आरबीआयमध्ये जमा करण्यात आलेत. खात्यात दरवर्षी व्याज जमा केले जाते. राजेंद्र प्रसाद यांचा बँकेतील खाते क्रमांक – 0380000100030687 त्यांच्या छायाचित्रासह सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या चित्राखाली खाते क्रमांक दिलेला आहे, अशी माहिती रंजन प्रकाश यांनी दिली.

संबंधित बातम्या

‘या’ बँकांमध्ये वर्षाच्या एफडीवर 6.50% पर्यंत व्याज, जाणून घ्या

पुढील वर्षी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, 6G साठीही होणार जलद काम

Published On - 2:05 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI