अहमदनगरमध्ये प्रसिद्ध उद्योजकाचे अपहरण, चार तासानंतर सुटका

अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे अपहरण (Businessman karimbhai hundekari kidnapping) झाले होते. पण चार तासांनी अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केली.

अहमदनगरमध्ये प्रसिद्ध उद्योजकाचे अपहरण, चार तासानंतर सुटका
| Edited By: | Updated on: Nov 18, 2019 | 9:29 PM

अहमदनगर : अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे अपहरण (Businessman karimbhai hundekari kidnapping) झाले होते. पण चार तासांनी अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केली. हुंडेकरी यांचे आज सकाळी (18 नोव्हेंबर)  6 च्या दरम्यान राहत्या घराजवळून अपहरण झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हुंडेकरी (Businessman karimbhai hundekari kidnapping) यांच्या अपहरणाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हुंडेकरी यांचे सकाळी अपहरण झाल्यानंतर चार तासांनी त्यांची सुटका झाली. अपहरणकर्त्यांनी त्यांना जालना येथे सोडून दिले. मात्र त्यांना कोणतीही इजा केली नाही. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हुंडेकरी यांना सकाळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून एका गाडीत बसवून पळवल्याचे सांगितले जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे चार पथक विविध ठिकाणी रवानाही करण्यात आले होते.

“ही घटना गंभीर असून हा प्रकार कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना काही धागेदोरेही मिळाले असल्याची शक्यता आहे. या प्रकरणांमध्ये नेमके कोण आहे, हे तपासात पुढे येईल. त्यावर आताच भाष्य करणे योग्य नाही नाही. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही माहिती मिळाली आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.